AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Varsha Usgaonkar: वर्षा उसगांवकर यांच्या पतीला कॅमेऱ्याची एवढी भीती का? बिग बॉसच्या घरातही भेटायला आले नव्हते; अभिनेत्रीने सांगितलं कारण

Varsha Usgaonkar: नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी त्यांच्या पतीचे काही फोटो दाखवले. त्याचसोबत त्यांचे पती कॅमेरासमोर येणं का टाळतात, याचाही खुलासा त्यांनी केला.

Varsha Usgaonkar: वर्षा उसगांवकर यांच्या पतीला कॅमेऱ्याची एवढी भीती का? बिग बॉसच्या घरातही भेटायला आले नव्हते; अभिनेत्रीने सांगितलं कारण
वर्षा उसगांवकर आणि त्यांचे पती अजय शर्माImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 17, 2026 | 12:24 PM
Share

Varsha Usgaonkar: मराठी मनोरंजनविश्वातील एव्हरग्रीन अभिनेत्री वर्षा उसगांवकर आपल्या अभिनयामुळे आणि सौंदर्यामुळे आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. नव्वदच्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, वर्षा उसगांवकर यांच्या व्यावसायिक आयुष्याइतकीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चाहत्यांना उत्सुकता असते. विशेष म्हणजे, त्या सोशल मीडियावर पतीसोबतचे फोटो फारसे शेअर करताना दिसत नाहीत. त्यांचे पती नेमके काय करतात? ते सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये का दिसत नाहीत? असे प्रश्न अनेकदा चाहत्यांना पडतात. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वर्षा यांनी यामागचं कारण सांगितलं आहे.

कोण आहेत वर्षा उसगांवकर यांचे पती?

वर्षा उसगांवकर यांनी नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी चाहत्यांना आपल्या घराची झलक दाखवली. घरातील विविध आठवणी आणि फोटोंबद्दल सांगताना त्यांनी पती अजय शर्मा यांचा फोटोही दाखवला. यावेळी त्या म्हणाल्या, “हे माझे मिस्टर आहेत. त्यांना फोटो काढायला अजिबात आवडत नाही. ते निर्माते आणि दिग्दर्शक म्हणून काम करतात. त्यामुळे त्यांना कॅमेऱ्याच्या मागे राहायला आवडतं.” वर्षा यांनी पुढे सांगितलं की, त्या ‘बिग बॉस मराठी’च्या घरात असतानाही त्यांचे पती त्यांना भेटायला आले नव्हते. त्यावेळी केवळ त्यांची बहीण भेटायला आली होती. अजय शर्मा यांना सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जाणं किंवा कॅमेऱ्यासमोर येणं फारसं आवडत नाही.

या मुलाखतीत वर्षा यांना पतीसोबतचे फोटो सोशल मीडियावर का दिसत नाहीत, असा प्रश्नही विचारण्यात आला. यावर त्यांनी अतिशय मजेशीर उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, “त्यांना कार्यक्रमांनाही विशेष यायला आवडत नाही. त्यांना फोटोग्राफीची आवड आहे. माझे सगळ्यात सुंदर फोटो त्यांनीच काढले आहेत. ते खूप छान फोटो काढतात. त्यांना फोटो काढायला आवडतात; पण स्वतः फोटोत उभं राहायला आवडत नाही.” पतीला कॅमेऱ्यासमोर येण्यापेक्षा कॅमेऱ्याच्या मागे राहणे अधिक आवडतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं. कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये मात्र त्यांचे फोटो काढले जातात.

2000 मध्ये बांधली लग्नगाठ

वर्षा उसगांवकर आणि अजय शर्मा यांनी मार्च 2000 मध्ये लग्न केलं. अजय शर्मा हे प्रसिद्ध संगीतकार रवी शंकर शर्मा यांचे पुत्र आहेत. त्यांचे वडील हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ संगीतकार होते. त्यांनी जवळपास 250 चित्रपटांसाठी संगीत दिलं होतं. ‘ऐ मेरी जोहरा जबीं’, ‘आगे भी जाने ना तू’ आणि ‘एक फूल दो माली’ यांसारखी लोकप्रिय गाणी त्यांच्या संगीतामुळे गाजली. वर्षा उसगांवकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक गाजलेल्या भूमिका साकारल्या आहेत. ‘हमाल दे धमाल’, ‘अफलातून’, ‘गंमत जम्मत’ आणि ‘सवत माझी लाडकी’ यांसारख्या चित्रपटांमधून त्या लोकप्रिय झाल्या.

Follow Us
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी एकनाथ शिंदेंकडून...
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी एकनाथ शिंदेंकडून अभिवाद; त्यांनी दिलेल्या मुलमंत्राचं स्मरण करत म्हणाले...
बच्चन बाप-बेट्याला बुलेटप्रूफमध्येही मारु! गोल्डी ढिल्लोच्या दाव्याने
Amitabh Bachchan Safety : बच्चन बाप-बेट्याला बुलेटप्रूफमध्येही मारु! गोल्डी ढिल्लोच्या दाव्याने खळबळ
मोठी बातमी! महाराष्ट्रातील आणखी 18 तालुके दुष्काळग्रस्त होणार? आज...
महाराष्ट्रातील आणखी 18 तालुके दुष्काळग्रस्त होणार? आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक!
ऑपरेशन टायगरवर आशिष जयस्वाल यांचे सूचक विधान; ठाकरे गटाच्या...
ऑपरेशन टायगरवर आशिष जयस्वाल यांचे सूचक विधान; ठाकरे गटाच्या नेतृत्वाबाबत काय म्हणाले?
छठपूजेनंतर महाराष्ट्रात काही ठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य! रामकुंड...
छठपूजेनंतर महाराष्ट्रात अस्वच्छतेचे साम्राज्य! रामकुंडाच्या पायऱ्यांवर आडनावे, समुद्रकिनाऱ्यांवर कचऱ्याचे ढीग
रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन; शेकडो कार्यकर्ते
Eknath shinde : रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन; शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
जळगाव जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून लढणार, दोन जागांचा तिढा कायम
Jalgaon : जळगाव जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून लढणार, दोन जागांचा तिढा कायम
मुंबईत प्रदूषणाचा विळखा! हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांच्या...
मुंबईत प्रदूषणाचा विळखा! हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांच्या आरोग्याची चिंता
SRA आरोपांवर प्रताप सरनाईक आक्रमक; संजय राऊतांना सुनावले...
SRA आरोपांवर प्रताप सरनाईक आक्रमक; संजय राऊतांना सुनावले, अपना घर घोटाळ्यावरही मोठा इशारा!
शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुनावणीची शक्यता...
Shivsena Hearing Update : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुनावणीची शक्यता