AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray : शरद पवार राष्ट्रवादीने अजित पवारांच्या पुतळ्यासमोर बसून..विलिनीकरण, सत्तेत जाण्याच्या मुद्यावर उद्धव ठाकरेंची मार्मिक टिप्पणी

Uddhav Thackeray : डिलिमिटेशनबद्दलही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये स्पष्टता नाहीय. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, 'तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे. माझं मत विचारलं तर मी सांगेन'

Uddhav Thackeray : शरद पवार राष्ट्रवादीने अजित पवारांच्या पुतळ्यासमोर बसून..विलिनीकरण, सत्तेत जाण्याच्या मुद्यावर उद्धव ठाकरेंची मार्मिक टिप्पणी
Uddhav Thackeray
| Updated on: Nov 17, 2026 | 12:49 PM
Share

शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रोहित पवार यांनी काल अखेर पत्रकार परिषद घेऊन तो मफलर मॅन कोण? याचा उलगडा केला. त्यांनी देवेंद्र फडणवीसांचा फोटो दाखवला. देवेंद्र फडणवीस हे वीएसआर कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न करतायत असा रोहित पवार यांचा आरोप आहे. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, “एकूण घटनाक्रम पाहिला तर वीएसआर कंपनीवर कारवाई झालेली दिसत नाही. रोहित पवार जे म्हणतायत त्यात वावगं आहे असं म्हणण्याचं कारण नाही. त्यांच्याकडे पुरावे असतील तर अमित शाहंनी त्यांचे फोन उचलावेत” शरद पवार यांच्या पक्षात विलिनीकरणाबद्दल, सत्तेत जाण्याबद्दल संभ्रमावस्था दिसून येते, त्यावर उद्धव ठाकरे यांनी मार्मिक टिप्पणी केली. अजित पवार यांच्या पुतळ्याच्या अनावरणाला राष्ट्रवादी काँग्रेसचे बरेचसे नेते होते. त्यामुळे त्यांच्या पुतळ्यासमोर बसून निर्णय घ्यावा.

डिलिमिटेशनबद्दलही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये स्पष्टता नाहीय. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे. माझं मत विचारलं तर मी सांगेन’ अमित शाह काल पुण्यात अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी आले होते. त्यावेळी अमित शाह म्हणाले की, कोविड काळात फोन केल्यावर अजित पवार उपलब्ध असायचे. पण उद्धव ठाकरेंशी संपर्क होत नव्हता. त्यावर उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं. “अमित शाह किती दिवसांनी अवतीर्ण झालेत. कारण दिल्लीत जेन झी वर अत्याचार केल्यानंतर लोकसभेत बाथरुमला जायचे पण सभागृहात येत नव्हते. असा हा चकाट्या पिटणार गृहमंत्री आहे, त्यांनी आपल्या कारकि‍र्दीत चकाट्या पिटण्याखेरीज काय केलय” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

(बातमी अपडेट होत आहे)

Follow Us
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी उद्धव ठाकरेंकडून शक्तीस्थळी अभिवादन
Uddhav Thackeray : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी उद्धव ठाकरेंनी शक्तीस्थळी जाऊन केले अभिवादन!
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी एकनाथ शिंदेंकडून...
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी एकनाथ शिंदेंकडून अभिवाद; त्यांनी दिलेल्या मुलमंत्राचं स्मरण करत म्हणाले...
बच्चन बाप-बेट्याला बुलेटप्रूफमध्येही मारु! गोल्डी ढिल्लोच्या दाव्याने
Amitabh Bachchan Safety : बच्चन बाप-बेट्याला बुलेटप्रूफमध्येही मारु! गोल्डी ढिल्लोच्या दाव्याने खळबळ
मोठी बातमी! महाराष्ट्रातील आणखी 18 तालुके दुष्काळग्रस्त होणार? आज...
महाराष्ट्रातील आणखी 18 तालुके दुष्काळग्रस्त होणार? आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक!
ऑपरेशन टायगरवर आशिष जयस्वाल यांचे सूचक विधान; ठाकरे गटाच्या...
ऑपरेशन टायगरवर आशिष जयस्वाल यांचे सूचक विधान; ठाकरे गटाच्या नेतृत्वाबाबत काय म्हणाले?
छठपूजेनंतर महाराष्ट्रात काही ठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य! रामकुंड...
छठपूजेनंतर महाराष्ट्रात अस्वच्छतेचे साम्राज्य! रामकुंडाच्या पायऱ्यांवर आडनावे, समुद्रकिनाऱ्यांवर कचऱ्याचे ढीग
रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन; शेकडो कार्यकर्ते
Eknath shinde : रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन; शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
जळगाव जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून लढणार, दोन जागांचा तिढा कायम
Jalgaon : जळगाव जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून लढणार, दोन जागांचा तिढा कायम
मुंबईत प्रदूषणाचा विळखा! हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांच्या...
मुंबईत प्रदूषणाचा विळखा! हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांच्या आरोग्याची चिंता
SRA आरोपांवर प्रताप सरनाईक आक्रमक; संजय राऊतांना सुनावले...
SRA आरोपांवर प्रताप सरनाईक आक्रमक; संजय राऊतांना सुनावले, अपना घर घोटाळ्यावरही मोठा इशारा!