AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मामा गोविंदा ज्याचा विचारही करणार नाही असे विधान कृष्णा अभिषेककडून, थेट समय रैनासोबत मिळून..

बॉलिवूड अभिनेता गोविंदा त्याच्या खासगी आयुष्यामुळे तूफान चर्चेत आहे. गोविंदा आणि सुनीता आहूजा यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला. त्यातच आता समय रैनाने गोविंदाची मोठी खिल्ली उडवली आहे.

मामा गोविंदा ज्याचा विचारही करणार नाही असे विधान कृष्णा अभिषेककडून, थेट समय रैनासोबत मिळून..
Samay Raina Krishna Abhishek
| Updated on: Nov 17, 2026 | 1:01 PM
Share

अभिनेता गोविंदा आणि सुनीता आहूजा यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला. सुनीता आहूजा सातत्याने गंभीर आरोप गोविंदावर करताना दिसत आहे. कोमल रानी स्वर्णकारसोबत गोविंदाचे नाव जोडले जात आहे. त्यांचे काही फोटोही व्हायरल झाली आहेत. गोविंदाच्या खासगी आयुष्यातील वाद चव्हाट्यावर आलेला असताना कॉमेडियन समय रैना याने मजाक उडवला. गोविंदाचा भाचा कृष्णा अभिषेक हा समय रैना याच्या इंडियाज गॉट लॅंटेटमध्ये पाहुणा म्हणून पोहोचला. यावेळी समय रैना याने मजाक मजाकमध्ये गोविंदाच्या खासगी आयुष्याबद्दल खिल्ली उडवली. कृष्णा अभिषेक, बलराज घई, आशिष सोलंकी आणि हुमा कुरैशी यांचे स्वागत समय रैनाने केले. यावेळी समय रैनाने म्हटले की, काय जबरदस्त पॅनल आज आहे.

कृष्णा अभिषेक याचे स्वागत करत समय रैनाने म्हटले की, कपिल शर्मा शोचे बलराज देखील आपल्यात आहेत. कपिल शर्मा याच्या शोला टार्गेट करत समयने म्हटले की, कृष्णा भाई तुला स्क्रिप्ट नसताना बोलताना कसे वाटत आहे. काही वेळ शांत राहत कृष्णा अभिषेक याने म्हटले की, समजले की नाही? एक शब्दही निघाला नाही. समय रैनाने कपिल शर्मा शो स्क्रिप्टेड असल्याचेही म्हटले.

गोविंदाची खिल्ली उडवत समय रैना याने कृष्णा अभिषेक याला म्हटले की, कृष्णाला अगोदर गोविंदाचा भाचा म्हणून ओळखले जायचे. पण आता त्यांच्यासोबत जे काही सुरू आहे, त्यावर ते म्हणत आहेत की मी कृष्णा अभिषेक याचा मामा आहे. समय रैनाचे हे बोलणे ऐकून उपस्थित लोक हसताना दिसले. यावेळी कृष्णा अभिषेक याने स्पष्ट म्हटले की, हे नको… नाही तर आपलेच भांडण होईल…

पुढे मजाकमध्ये कृष्णा अभिषेकने पुढे म्हटले की, समय माझ्या मामाबद्दल काही बोलू नको.. जर ते इथे आले तर तुला त्यांच्या पाया पडून माफी मागावी लागेल आणि माहिती नाही की, ते गोळी कुठे चालवतील. यावेळी गोविंदा त्यांच्या पायामध्येच गोळी मारून घेतात, अशाप्रकारचीही कमेंट करण्यात आली.

Follow Us
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी उद्धव ठाकरेंकडून शक्तीस्थळी अभिवादन
Uddhav Thackeray : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी उद्धव ठाकरेंनी शक्तीस्थळी जाऊन केले अभिवादन!
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी एकनाथ शिंदेंकडून...
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी एकनाथ शिंदेंकडून अभिवाद; त्यांनी दिलेल्या मुलमंत्राचं स्मरण करत म्हणाले...
बच्चन बाप-बेट्याला बुलेटप्रूफमध्येही मारु! गोल्डी ढिल्लोच्या दाव्याने
Amitabh Bachchan Safety : बच्चन बाप-बेट्याला बुलेटप्रूफमध्येही मारु! गोल्डी ढिल्लोच्या दाव्याने खळबळ
मोठी बातमी! महाराष्ट्रातील आणखी 18 तालुके दुष्काळग्रस्त होणार? आज...
महाराष्ट्रातील आणखी 18 तालुके दुष्काळग्रस्त होणार? आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक!
ऑपरेशन टायगरवर आशिष जयस्वाल यांचे सूचक विधान; ठाकरे गटाच्या...
ऑपरेशन टायगरवर आशिष जयस्वाल यांचे सूचक विधान; ठाकरे गटाच्या नेतृत्वाबाबत काय म्हणाले?
छठपूजेनंतर महाराष्ट्रात काही ठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य! रामकुंड...
छठपूजेनंतर महाराष्ट्रात अस्वच्छतेचे साम्राज्य! रामकुंडाच्या पायऱ्यांवर आडनावे, समुद्रकिनाऱ्यांवर कचऱ्याचे ढीग
रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन; शेकडो कार्यकर्ते
Eknath shinde : रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन; शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
जळगाव जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून लढणार, दोन जागांचा तिढा कायम
Jalgaon : जळगाव जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून लढणार, दोन जागांचा तिढा कायम
मुंबईत प्रदूषणाचा विळखा! हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांच्या...
मुंबईत प्रदूषणाचा विळखा! हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांच्या आरोग्याची चिंता
SRA आरोपांवर प्रताप सरनाईक आक्रमक; संजय राऊतांना सुनावले...
SRA आरोपांवर प्रताप सरनाईक आक्रमक; संजय राऊतांना सुनावले, अपना घर घोटाळ्यावरही मोठा इशारा!