AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2026 Points Table: इंग्लंड असलेल्या गटात सुपर 8 फेरीची चुरस वाढली, झालं असं की…

ICC Men’s T20 World Cup 2026 Match Points Table: टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील प्रत्येक सामन्यानंतर सुपर 8 फेरीची रंगत वाढत चालली आहे. कारण साखळी फेरीतील सामने अंतिम टप्प्यात आहेत. त्यात प्रत्येक गटातील टॉप 2 संघाना पुढच्या फेरीत जागा मिळणार आहे. पण क गटात चुरस आहे.

T20 World Cup 2026 Points Table: इंग्लंड असलेल्या गटात सुपर 8 फेरीची चुरस वाढली, झालं असं की...
इंग्लंड असलेल्या गटात सुपर 8 फेरीची चुरस वाढली, झालं असं की...Image Credit source: England/Scotland Cricket Twitter
| Updated on: Feb 14, 2026 | 7:53 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धा 2026 स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने आता अंतिम टप्प्यात आले आहे. साखळी फेरीसाठी एकूण चार गट असून प्रत्येक गटात पाच संघ आहे. यापैकी आपआपल्या गटात टॉप 2 स्थानी असलेल्या संघांना सुपर 8 फेरीत जागा मिळणार आहे. त्यामुळे आता शेवटच्या टप्प्यात चुरशीची लढाई पाहायला मिळणार आहे. अजून तरी कोणत्याही संघाने सुपर 8 फेरीत जागा मिळवलेली नाही. पण एक एक करून काही संघ या स्पर्धेतून आऊट होत आहेत. येत्या दोन दिवसात हे चित्र स्पष्ट होईल. असं असताना गट क मधील सुपर आठ फेरीची चुरस वाढली आहे. कारण या गटात सर्वच संघांना सुपर 8 फेरीची संधी आहे. त्यामुळे काय होईल सांगता येत नाही. इंग्लंड स्कॉटलँड सामन्यानंतर या गटात आणखी गुंता वाढला आहे. या गटात वेस्ट इंडिज, इंग्लंड, स्कॉटलँड, इटली आणि नेपाळ हे संघ आहेत.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत वेस्ट इंडिजने आतापर्यत 2 सामने खेळले असून दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिजच्या पदरात 4 गुण असून नेट रनरेट हा +1.625 आहे. वेस्ट इंडिजचा संघ या गटात अव्वल स्थानी असून सुपर 8 फेरीसाठी एक विजय मिळवला तर स्थान पक्कं होईल. पण दुसऱ्या स्थानासाठी इंग्लंड, स्कॉटलँड, इटली या संघात चुरस असेल. नेपाळने सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले आहेत. त्यामुळे उर्वरित 2 सामन्यात विजय मिळवला तरंच संधी आहे. पण हे गणित देखील जर तरवर अवलंबून असणार आहे. एखादा मोठा उलटफेर झाला तर या गटाचं चित्र बदलेल. अन्यथा या स्पर्धेतील नेपाळचं आव्हान संपुष्टात येईल.

इंग्लंडने 3 पैकी 2 सामन्यात विजय मिळवून 4 गुण आणि -0.143 नेट रनरेटसह दुसरं स्थान पटकावलं आहे. पण अजूनही सुपर 8 फेरीचं गणित सुटलेलं नाही. इंग्लंडचा शेवटचा सामना इटलीशी होणार आहे. या सामन्यात इंग्लंडचं विजयाचं गणित चुकलं तर स्कॉटलँडला संधी मिळू शकते. स्कॉटलँडचा शेवटचा सामना नेपाळशी होणार आहे. या सामन्यात स्कॉटलँडला काहीही करून विजय मिळवावा लागेल. पण इंग्लंड इटली सामन्याकडे लक्ष ठेवावं लागेल.

Follow Us
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग.
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू.
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण.
अशोक खरात सोबत शिंदे, चाकणकरांचे कॉल्स; अंजली दमानियांकडे CDR?
अशोक खरात सोबत शिंदे, चाकणकरांचे कॉल्स; अंजली दमानियांकडे CDR?.
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.