AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SCO vs ENG : टी20 वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडने स्कॉटलँडला 5 विकेट राखून नमवलं, असं घडलं या सामन्यात

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडने स्कॉटलँडला पराभूत करत स्पर्धेत दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे.  इंग्लंडने स्कॉटलँडला 6 गडी राखून पराभूत केलं. तसेच गटात दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. 

SCO vs ENG : टी20 वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडने स्कॉटलँडला 5 विकेट राखून नमवलं, असं घडलं या सामन्यात
Image Credit source: England/Scotland Cricket Twitter
| Updated on: Feb 14, 2026 | 6:29 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या 23व्या सामन्यात इंग्लंड आणि स्कॉटलँड हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा इंग्लंडच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्कॉटलँडने प्रथम फलंदाजी करताना 19.4 षटकात सर्व गडी गमवून 152 धावा केल्या. तसेच विजयासाठी 153 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान इंग्लंडने 18.2 षटकात 5 गडी गमवून पूर्ण केलं. खरं तर पावर प्लेमध्ये इंग्लंडने दोन महत्त्वाचे विकेट गमावले होते. त्यामुळे दडपण वाढल होतं. पण टॉम बँटनने आपल्या खेळीने हे दडपण दूर केलं. या विजयासह इंग्लंडच्या सुपर 8 फेरीच्या आशा अजूनही जिवंत आहेत. गुणतालिकेत इंग्लंडने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. त्यामुळे पुढच्या सामन्यात ही रंगत आणखी वाढणार आहे.

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात स्कॉटलँडची सुरुवात निराशाजनक झाली. स्कॉटलँडला संघाच्या 18 धावा असताना दोन धक्के बसले. त्यामुळे मोठ्या धावसंख्येला खिळ बसली असं वाटत होतं. पण त्यानंतर मायकल जोन्स आणि रिची बेरिंगटन यांनी डाव सावरला. मायकल जोन्स 20 चेंडूत 30 धावांची खेळी करून बाद झाला. त्यानंतर चौथ्या विकेटसाठी रिची बेरिंगटन आणि टॉम ब्रूस यांनी 71 धावांची भागीदारी केली. त्यामुळे स्कॉटलँडला धावसंख्येत मोठी भर पडली. रिची बेरिंगटनचं अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकलं. त्याने 32 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकार मारत 49 धावांची खेळी केली. पण ही जोडी फुटताच पुन्हा एकदा डाव पत्त्यासारखा कोसळला. ओलिवर डेविडसन याने नाबाद 20 धावांची खेळी केली. तर इतर खेळाडू एकेरी धावांवर तंबूत परतले.

शेवटच्या दोन षटकात काय झालं?

इंग्लंड स्कॉटलँड सामना अतितटीचा झाला नसला तरी शेवटच्या 2 षटकात 8 धावांची गरज होती. त्यात पाकिस्तानच्या हाती पाच विकेट होत्या. असं असताना पहिल्या दोन चेंडूतच विल जॅक्सने सामना संपवला. पहिल्या चेंडूवर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार मारून सामना जिंकवला. या सामन्यात टॉम बँटनची खेळी महत्त्वाची ठरली. त्याने 41 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकार मारत नाबाद 63 धावांची खेळी केली. त्याची खेळी इंग्लंडच्या विजयात मोलाची ठरली.

Follow Us
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा
धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता इमारतीत राहणार धारावीकर
Video : धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता झोपडपट्टी नाही तर, इमारतीत राहणार धारावीकर
'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी
Prashant Ambi : कोणता जिहादी मदत करतो.., 'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी; संजय गायकवाडांच्या आरोपांनंतर खळबळ
महिलांवर दबाव असल्याने त्या..., संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
Video : महिलांवर दबाव असल्याने त्या..., श्वेता महालेंचे संजय गायकवाडांवर गंभीर आरोप