IND vs NZ : कसोटी मालिकेआधी टीम इंडियासाठी चांगली गोष्ट घडली, न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू हात फ्रॅक्चर झाल्यामुळे सीरीज मधून OUT
IND vs NZ : लवकरच भारत-न्यूझीलंडमध्ये टेस्ट सीरीज सुरु होणार आहे. या कसोटी मालिकेआधी न्यूझीलंडला टीमला धक्का बसला आहे. त्यांचा दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे खेळू शकणार नाहीय.

टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्ध टी20 आणि वनडे सीरीज मध्ये विजय मिळवला. आता टेस्ट सीरीज सुरु होणार आहे. या कसोटी मालिकेआधी न्यूझीलंडच्या टीमला मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा ऑलराऊंडर मिचेल सँटनरला दुखापत झाली आहे. भारताविरुद्ध टेस्ट सीरीजमध्ये तो खेळू शकणार नाहीय. भारत-न्यूझीलंडमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. सँटनरचा हात फ्रॅक्चर झाला आहे, त्यामुळे तो टेस्ट सीरीजमधून बाहेर गेला आहे. न्यूझीलंडच्या निवड समितीने टेस्ट सीरीजसाठी सँटनरच्या जागी पर्यायी खेळाडूची निवड केली आहे. भारताविरुद्ध पाचव्या वनडे मॅचमध्ये खेळताना सँटनरचा हात फ्रॅक्चर झाला होता. स्कॅनमध्ये त्याचा हात फ्रॅक्चर झाल्याचं दिसून आलं. या इंजरीमुळे तो भारताविरुद्ध टेस्ट सीरीज खेळू शकणार नाहीय.
डिसेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. त्यात तरी तो खळू शकणार आहे की नाही या बद्दल सस्पेंस आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिकेत सँटनर खेळणार की नाही या बद्दल लवकरच माहिती देऊ असं न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. मिचेल सँटनर मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये न्यूझीलंडचा कॅप्टन आहे.
सँटनरच्या जागी कोणाची निवड?
भारताविरुद्ध कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडने मिचेल सँटनरच्या जागी सेंट्रल डिस्ट्रिक्टचा स्पिन ऑलराउंडर डीन फॉक्सक्रॉफ्टची निवड केली आहे. फॉक्सक्रॉफ्टकडे फक्त एक टेस्ट मॅच खेळण्याचा अनुभव आहे. याचवर्षी मे महिन्यात फॉक्सक्रॉफ्टने आयर्लंड विरुद्ध टेस्ट डेब्यू केला होता. त्यात त्याने 98 रन्स केलेल्या.
View this post on Instagram
आतापर्यंत 33 टेस्ट मॅच खेळला आहे
मिचेल सँटनर न्यूझीलंडसाठी आतापर्यंत 33 टेस्ट मॅच खेळला आहे. त्याने 56 इनिंगमध्ये 80 विकेट काढल्या आहेत. 46 इनिंगमध्ये 1086 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि चार हाफ सेंच्युरी आहेत. सँटनर ऑलराऊंडर खेळाडू आहे. तो बॅटिंग आणि बॉलिंग मध्ये दोन्हींमध्ये उपयुक्त आहे. अशावेळी सँटनरची कमतरता न्यूझीलंडला जाणवू शकते.
