LPG Crisis | सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण
राज्यातील अनेक शहरांमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागपूर, अमरावती आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये अजूनही ग्राहकांच्या लांबच लांब रांगा कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईतील मालाड परिसरातील मालवणी भागात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रांगा लावल्या आहेत.
राज्यातील अनेक शहरांमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागपूर, अमरावती आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये अजूनही ग्राहकांच्या लांबच लांब रांगा कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईतील मालाड परिसरातील मालवणी भागात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रांगा लावल्या आहेत. अनेकजण रिकामे सिलेंडर घेऊन एजन्सीबाहेर थांबलेले दिसत आहेत. काही ठिकाणी नागरिकांनी आपला क्रम राखण्यासाठी सिलेंडरला कुलूप लावून ठेवले असल्याचेही निदर्शनास आले आहे. नागपूरमध्ये परिस्थिती अधिक गंभीर दिसून येत आहे. गॅस गोडाऊनमधून सिलेंडरचे वितरण बंद असल्याचे सांगण्यात येत असतानाही नागरिक गोडाऊनबाहेर रांगा लावून उभे आहेत. तब्बल 17 दिवसांपासून लोक सिलेंडरसाठी प्रतीक्षा करत आहेत. गोडाऊनबाहेर ‘नो स्टॉक’चे फलक लावण्यात आले असून, ऑनलाइन बुकिंगसाठीही नंबर लागत नसल्याने ग्राहकांचा मनस्ताप वाढला आहे.
दरम्यान, अमरावतीमध्ये सलग तिसऱ्या आठवड्यातही गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा कायम आहेत. या तुटवड्यामुळे सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
Published on: Apr 04, 2026 10:57 AM
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात; पहा व्हिडीओ
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल
धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेता

