AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाई झाला कारे? क्षुल्लक कारणावरुन तरुणाची हत्या, कल्याण हादरलं! नेमकं काय झालं?

सध्या कल्याणमधील एक प्रकरण चर्चेत आहे. एका तरुणाची क्षुल्लक कारणावरुन हत्या करण्यात आली आहे. आता नेमकं काय घडलं होतं? जाणून घ्या सविस्तर...

भाई झाला कारे? क्षुल्लक कारणावरुन तरुणाची हत्या, कल्याण हादरलं! नेमकं काय झालं?
कल्याणImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Apr 04, 2026 | 12:21 PM
Share

कल्याण पूर्वेत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कोळसेवाडी परिसरात मध्यरात्री एका तरुणावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला करण्यात आला. “काय बघतोस?” या क्षुल्लक कारणावरून सुरू झालेल्या वादाने थेट रक्तरंजित रूप घेतलं. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे, तर मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. आता नेमकं काय झालं होतं? चला जाणून घेऊया…

मध्यरात्री घडली घटना

कल्याण पूर्वेतील हनुमान नगर परिसरात गुरुवारी मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली. सर्वेश वायळे या तरुणावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला करण्यात आला. जुन्या वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

नेमकं काय झालं?

समोर आलेल्या माहितीनुसार, “माझ्याकडे काय बघतोस, भाई झाला का ?” असे म्हणत जुन्या वादातून अचानक हा वाद चिघळला आणि हल्लेखोरांनी सर्वेशवरजीवघेणा वार करत त्याला गंभीर जखमी केलं. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी साहिल म्हात्रे असून तो एक सराईत गुन्हेगार असून तो नुकताच जेलमधून बाहेर आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच्यावर यापूर्वीही त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. सध्या तो फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

दरम्यान, कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे. मात्र, कल्याण पूर्वेत वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे.या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून रात्रीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

पोलिसांकडून आश्वासन

कोळसेवाडी पोलिस स्टेशनने या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल केला असून, मुख्य आरोपी साहिल म्हात्रे याला लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली असून, सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या मदतीने तपास सुरू आहे.

Follow Us
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....
मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्था....
Tuljabhavani Temple : मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या धार्मिक व्यवस्थापकावर थेट....