Chandrashekhar Bawankule | जीव घेण्याचा कट पूर्णपणे…बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे म्हटले आहे. माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, “निवडणुकीत जिंकणं-हरणं हा भाग असतो. मात्र, निवडणूक जिंकण्यासाठी एवढी लाचारी दाखवणे योग्य नाही. कोणावर हल्ला करण्याचा किंवा जीव घेण्याचा कट रचणे हे पूर्णपणे अयोग्य आहे.”
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे म्हटले आहे. माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, “निवडणुकीत जिंकणं-हरणं हा भाग असतो. मात्र, निवडणूक जिंकण्यासाठी एवढी लाचारी दाखवणे योग्य नाही. कोणावर हल्ला करण्याचा किंवा जीव घेण्याचा कट रचणे हे पूर्णपणे अयोग्य आहे.” त्यांनी राजकारणात स्वस्थ स्पर्धा असावी आणि ज्याच्या नशिबात असेल तोच निवडून येतो, असेही स्पष्ट केले. दरम्यान, अमरावतीमध्ये आमदार प्रवीण तायडे यांच्या भावावर हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप बच्चू कडू यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी बच्चू कडू यांच्यासह आणखी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची मागणी होत आहे.
भोंदू अशोक खरात प्रकरणात तपास अधिक तीव्र झाला असून, या प्रकरणातील संबंधित नामकर्ण आवारे यांची शिर्डी पोलिसांकडून सुमारे तीन तास चौकशी करण्यात आली आहे. आवारे हे अशोक खरात यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती समोर आली आहे. तपासादरम्यान समता पतसंस्थेमध्ये आवारे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावाने सहा खाती उघडण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. या खात्यांमधून 2021 पासून सुमारे 1 कोटी 20 लाख रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे. मात्र, या सर्व आरोपांवर प्रतिक्रिया देताना आवारे यांनी कोणत्याही व्यवहारात आपला सहभाग नसल्याचा दावा केला आहे. “मी कोणताही व्यवहार केलेला नाही आणि खाते उघडताना माझी सहीदेखील नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. या विरोधाभासी दाव्यांमुळे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे झाले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?

