AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dattatray Bharne | शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...

Dattatray Bharne | शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले…

| Updated on: Jul 05, 2026 | 3:02 PM
Share

राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरमध्ये महत्त्वाची माहिती दिली. 30 जूनपर्यंत कर्जमाफीची रक्कम जमा करण्याचे उद्दिष्ट होते. त्यानंतर 5 जुलैची तारीख देण्यात आली होती. मात्र काही तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींमुळे प्रक्रिया थोडी उशिराने सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरमध्ये महत्त्वाची माहिती दिली. 30 जूनपर्यंत कर्जमाफीची रक्कम जमा करण्याचे उद्दिष्ट होते. त्यानंतर 5 जुलैची तारीख देण्यात आली होती. मात्र काही तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींमुळे प्रक्रिया थोडी उशिराने सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सध्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून पुरवणी मागण्यांमधील आर्थिक तरतुदींना मंजुरी मिळाल्यानंतर राज्यपालांची सही होईल. त्यानंतर लवकरात लवकर पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येईल, असे दत्तात्रय भरणे म्हणाले.

शेतकरी इन्कम टॅक्स संदर्भात 100% पडताळणी करूनच निर्णय घेतला जाईल. गरीब आणि पात्र शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळावा यासाठी सरकार काळजी घेत असल्याचे त्यांनी सांगितले. काही दिवस उशीर झाला तरी कोणतीही चूक होऊ नये यासाठी सर्व माहिती तपासली जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी निवडणूक नसतानाही शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल शेतकऱ्यांनी आभार मानावेत, असेही त्यांनी म्हटले.

Published on: Jul 05, 2026 03:02 PM

Follow Us
आज रात्रभर हॉटेल सुरू राहणार, रेस्टॉरंट्स पहाटे 4 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी; सरकारने का घेतला निर्णय?.

आज रात्रभर हॉटेल सुरू राहणार, रेस्टॉरंट्स पहाटे 4 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी; सरकारने का घेतला निर्णय?

Video: वयाच्या 39व्या वर्षी रोहित शर्माची कडक फिल्डिंग, प्रेक्षक उभे राहिले आणि टाळ्या वाजवून केलं कौतुक.

Video: वयाच्या 39व्या वर्षी रोहित शर्माची कडक फिल्डिंग, प्रेक्षक उभे राहिले आणि टाळ्या वाजवून केलं कौतुक

भाषण झालं, नेते गेले… पण आंदोलक जागा सोडायला तयार नाही, शिवाजी पार्कात आंदोलक आक्रमक; पोलिसांची धावाधाव.

भाषण झालं, नेते गेले… पण आंदोलक जागा सोडायला तयार नाही, शिवाजी पार्कात आंदोलक आक्रमक; पोलिसांची धावाधाव

IND vs ENG: टीम इंडियासमोर इंग्लंडचं 388 धावांचं कठीण आव्हान, लॉर्ड्सवर 1975नंतर मोठा विक्रम.

IND vs ENG: टीम इंडियासमोर इंग्लंडचं 388 धावांचं कठीण आव्हान, लॉर्ड्सवर 1975नंतर मोठा विक्रम

America Iran Clash : शेवटी अमेरिकेने तो निर्णय घेतलाच, तब्बल 50000 सैनिक…इराणवर महाभयंकर संकट?.

America Iran Clash : शेवटी अमेरिकेने तो निर्णय घेतलाच, तब्बल 50000 सैनिक…इराणवर महाभयंकर संकट?

सुप्रिया सुळे राजनाथ सिंह यांच्या पाया पडल्या, सर्वपक्षीय बैठकीनंतरचा VIDEO व्हायरल.

सुप्रिया सुळे राजनाथ सिंह यांच्या पाया पडल्या, सर्वपक्षीय बैठकीनंतरचा VIDEO व्हायरल