AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय राहिलंय आता? राहिलेत ते... ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान चर्चेत

काय राहिलंय आता? राहिलेत ते… ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान चर्चेत

| Updated on: Jul 05, 2026 | 2:25 PM
Share

ठाकरे गटातील काही आमदारही एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहेत. संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आता पक्षातील आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. येत्या मंगळवारी रात्री 7 वाजता मातोश्रीवर ही बैठक होणार असून सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. ठाकरे गटातील 6 खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षात अस्वस्थता वाढली आहे. त्यातच आदित्य ठाकरे यांचे विश्वासू मानले जाणारे सचिन आहिर यांनीही शिवसेना शिंदे गटाची साथ धरल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. शिंदे गटात प्रवेश करताच सचिन आहिर यांना विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची जबाबदारी देण्यात आली.

दरम्यान, ठाकरे गटातील काही आमदारही एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहेत. संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आता पक्षातील आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. येत्या मंगळवारी रात्री 7 वाजता मातोश्रीवर ही बैठक होणार असून सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ठाकरेंच्या या बैठक सत्रावर भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी खोचक टीका केली आहे. “ते प्रयत्न करतीलच, त्यांना पक्ष वाचवायचा आहे. मात्र आता काही करून काही अर्थ आहे का? काय उरलंय आता? जे राहिलेत पक्षात ते ही जात आहेत, रामरक्षा पठण आणि आंदोलन हा ठाकरे गटाचा एक केविलवाणा प्रयत्न आहे, फक्त स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी,” असे गिरीश महाजन म्हणाले. पुढे आदित्य ठाकरे पक्ष वाढवण्यात कमी पडले का विचारताच महाजन म्हणाले की, ‘असं कसं शक्य आहे एका वर्षभरात एखादा पक्ष अगदी नाहिसा होत आला, त्याला नेतृत्त्व कारणीभूत असेलचं.

Published on: Jul 05, 2026 02:21 PM

Follow Us
इंग्लंडने दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला नमवलं, मालिकेत 1-1 ने बरोबरी; लॉर्ड्सचं महत्त्व वाढलं.

इंग्लंडने दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला नमवलं, मालिकेत 1-1 ने बरोबरी; लॉर्ड्सचं महत्त्व वाढलं

NEET UG 2026 परीक्षेचा निकाल जाहीर, आर्यन गुप्ता आणि पंशुल बंसल अव्वल.

NEET UG 2026 परीक्षेचा निकाल जाहीर, आर्यन गुप्ता आणि पंशुल बंसल अव्वल

लॉर्ड्सवर रोहित शर्माच्या क्रिकेट कारकि‍र्दीला पूर्णविराम! वनडे वर्ल्डकप खेळणार नाही- रिपोर्ट्स.

लॉर्ड्सवर रोहित शर्माच्या क्रिकेट कारकि‍र्दीला पूर्णविराम! वनडे वर्ल्डकप खेळणार नाही- रिपोर्ट्स

धक्कादायक, एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारासह १४ जणांवर गुन्हा दाखल, काय नेमके प्रकरण ?.

धक्कादायक, एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारासह १४ जणांवर गुन्हा दाखल, काय नेमके प्रकरण ?

रोहित शर्माला वनडे वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर का काढलं जात आहे? जाणून घ्या 3 कारणं.

रोहित शर्माला वनडे वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर का काढलं जात आहे? जाणून घ्या 3 कारणं

जयंत पाटील अर्थमंत्री होणार ? महायुतीत अर्थमंत्री पदावरुन धुसफूस.

जयंत पाटील अर्थमंत्री होणार ? महायुतीत अर्थमंत्री पदावरुन धुसफूस