Thane | मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं वातावरण
ठाण्यातील मुंब्रा परिसरात मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा भिंत कोसळण्याची घटना घडली आहे. मुंब्रा येथील संजय नगर भागात एका भिंतीचा मोठा भाग कोसळल्याने परिसरात घबराट पसरली. या दुर्घटनेत जवळील 3 घरांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवितहानी किंवा दुखापत झालेली नाही. स्थानिक नागरिकांनी तातडीने घराबाहेर धाव घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

इतकेच नाही तर मुंब्र्यातील नामांकित सेंट मेरी शाळेची संरक्षक भिंत देखील कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळेजवळील भागात खबरदारीचा उपाय म्हणून काही काळ वाहतूकही रोखण्यात आली होती. सुदैवाने यावेळी विद्यार्थी शाळेत नव्हते.
घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेचे अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील धोकादायक भागाची पाहणी करण्यात येत असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे अशा घटना वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
Published on: Jul 05, 2026 01:35 PM
मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं...
पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड
जिल्हा बँकेंच्या निवडणुकीत मोठं घडतंय! महायतीतून अर्ज भरणाऱ्या दानवेंच
मोठा पूर! 33 हजार 408 क्युसेकने विसर्ग सुरू, महाराष्ट्रातील पवित्र नदी