डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची भाडेवाढ, प्रवासी संतप्त!
डोंबिवलीत रिक्षाचालकांनी शासनाच्या परवानगीविना अचानक 5 रुपयांची भाडेवाढ जाहीर केली आहे. 23 नोव्हेंबर 2026 पासून ही दरवाढ लागू होणार असून, प्रवाशांनी याला तीव्र विरोध दर्शवला आहे. वाढत्या खर्चाचे कारण देत रिक्षाचालक दरवाढीवर ठाम आहेत. तर प्रवाशांनी आरटीओ आणि प्रशासनाच्या हस्तक्षेप्याची मागणी केली आहे.
डोंबिवलीमध्ये रिक्षा भाडेवाढीवरून सध्या मोठा वाद सुरू आहे. शासनाच्या कोणतीही परवानगी किंवा प्रवाशांना कोणतीही पूर्वसूचना न देता, डोंबिवली पश्चिमेतील रिक्षाचालकांनी पाच रुपयांची भाडेवाढ जाहीर केली आहे. महात्मा फुले रिक्षा स्टँड परिसरात लावलेल्या बॅनरवर 23 नोव्हेंबर 2026 पासून ही दरवाढ लागू होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या अचानक झालेल्या दरवाढीमुळे प्रवासी संतप्त झाले आहेत.
प्रवाशांच्या मते, शासनाच्या नियमांनुसारच भाडेवाढ व्हायला हवी, रिक्षाचालकांनी मनमानी करणे योग्य नाही. अनेक प्रवाशांनी ही दरवाढ अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, रिक्षाचालकांनी मात्र वाढत्या इंधन, सीएनजी तसेच रिक्षा मेंटेनन्स खर्चाचे कारण देत दरवाढ योग्य असल्याचे म्हटले आहे. त्यांना दरवाढ व्हायलाच पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. जर भाडेवाढ मिळाली नाही, तर रिक्षा बंद करण्याचा इशाराही रिक्षाचालकांनी दिला आहे. यामुळे डोंबिवलीतील रिक्षा प्रवासाचे भवितव्य काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Published on: Nov 25, 2026 07:09 PM
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची...
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून...
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला..

