AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट तालुकाप्रमुखांची पक्षातून हलाकपट्टी, नेमकी भानगड काय?

शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट तालुकाप्रमुखांची पक्षातून हलाकपट्टी, नेमकी भानगड काय?

| Updated on: Nov 25, 2026 | 6:05 PM
Share

शिवसेनेचे चाळीसगाव तालुकाप्रमुख राहुल पाटील यांची जिल्हाप्रमुख मनोहर पाटील यांनी पक्षातून हकालपट्टी केली आहे. यानंतर राहुल पाटील यांनी मनोहर पाटील आणि आमदार किशोर पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. आमदार किशोर पाटील यांनी नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार केल्याचा दावा करत राहुल पाटील यांनी पक्षशिस्त केवळ कार्यकर्त्यांनाच का, असा सवाल उपस्थित केला.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोहर पाटील यांनी चाळीसगावचे तालुकाप्रमुख राहुल पाटील यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. या कारवाईनंतर राहुल पाटील यांनी जिल्हाप्रमुख मनोहर पाटील आणि आमदार किशोर पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राहुल पाटील यांनी म्हटले आहे की, आमदार किशोर पाटील यांनी नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार केला.

ही पक्षशिस्त मोडणारी कृती असून, पक्षशिस्त केवळ कार्यकर्त्यांनाच लागू आहे का, नेत्यांना नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “मी शिवसेनेची अशी कोणती शिस्त मोडली, ज्यामुळे मला पक्षातून हकालपट्टी करण्यात आली?” असे राहुल पाटील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. त्यांनी जिल्हाप्रमुख मनोहर पाटील यांच्यावरही टीका केली. “एकनाथ शिंदे साहेब शिवसेना घराघरात पोहोचवत असताना, जिल्हाप्रमुख म्हणून तुम्ही शिवसेनेच्या उमेदवारांना माघार घ्यायला लावत आहात, हे चुकीचं आहे. मुळात तुमच्यावरच पक्षशिस्तभंगाची कारवाई व्हायला पाहिजे,” असे राहुल पाटील म्हणाले. या सर्व प्रकाराबाबत आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कानावर घालणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Published on: Nov 25, 2026 06:05 PM

Follow Us