AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंडमधून 5 आरोपी जेरबंद!

पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंडमधून 5 आरोपी जेरबंद!

| Updated on: Nov 25, 2026 | 7:25 PM
Share

पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेर मंदार किवळे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. दौंडमधून तीन हल्लेखोरांसह दोन संशयितांना पकडण्यात आले आहे. जमिनीच्या वादातून शुभम चव्हाणच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हा हल्ला झाल्याचा संशय असून, हल्लेखोरांनी वापरलेली स्कूटरही जप्त करण्यात आली आहे.

पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेर मंदार किवळे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. दौंड परिसरातून तीन मुख्य हल्लेखोरांसह दोन संशयितांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाच्या बाहेर आरोपी मंदार किवळे यांच्यावर गोळीबार करण्यात आला, तसेच कोयत्याने सपासप वार करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे, मंदार किवळे चार दिवसांपूर्वीच कारागृहातून जामिनावर बाहेर आले होते.

जमिनीच्या वादातून मंदारने शुभम चव्हाणची हत्या केली होती, असा त्याच्यावर आरोप आहे. या हल्ल्यामागे शुभम चव्हाणचा भाऊ अक्षय चव्हाण असल्याचे कळते, त्यानेच बदला घेण्यासाठी हे कृत्य केल्याचा संशय आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तीन हल्लेखोरांसह दोन संशयितांची सखोल चौकशी सुरू आहे. आरोपींनी हल्ल्यासाठी वापरलेली स्कूटरही जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून, आणखी काही आरोपींचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे.

Published on: Nov 25, 2026 07:25 PM

Follow Us