AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai | पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड

Mumbai | पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड

| Updated on: Jul 05, 2026 | 1:15 PM
Share

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना समोर येत आहेत. अशातच मुंबईतील चार बंगला परिसरात एक मोठी दुर्घटना घडली. जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे रस्त्याच्या कडेला उभे असलेले मोठे झाड अचानक एका ऑटो रिक्षावर कोसळले. ही घटना घडताच परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना समोर येत आहेत. अशातच मुंबईतील चार बंगला परिसरात एक मोठी दुर्घटना घडली. जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे रस्त्याच्या कडेला उभे असलेले मोठे झाड अचानक एका ऑटो रिक्षावर कोसळले. ही घटना घडताच परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दुसरकडे दादरमध्ये मंदिराजवळच भलं मोठं झाल कोसळल्याची घटना घटली आहे. आतापर्यंत दादरमध्ये 7 झाडंची पडझड पहायला मिळाली आहे.

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ऑटो रिक्षामध्ये त्या वेळी प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र झाडाच्या वजनामुळे ऑो रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. त्यानंतर BMC चे कर्मचारी आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले.

कर्मचाऱ्यांनी त्वरित झाड हटवण्याचे काम सुरू केले आणि काही वेळातच रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला. मुंबईत सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Published on: Jul 05, 2026 01:15 PM

Follow Us