मविआ’तील गळती काही थांबेना! पद, 20 कोटी अन्… बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सत्ताधारी पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राममंदिरातील चोरी प्रकरण, पक्षातील बंडखोरी आणि विरोधी पक्षातील आमदारांना दिल्या जाणाऱ्या ऑफर यावर गंभीर आरोप केले.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सत्ताधारी पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राममंदिरातील चोरी प्रकरण, पक्षातील बंडखोरी आणि विरोधी पक्षातील आमदारांना दिल्या जाणाऱ्या ऑफर यावर गंभीर आरोप केले. आधीच ठाकरे गटातील 6 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राजकीय वातावरण तापलेले असताना आता आणखी एका आमदाराच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
संजय राऊत यांनी दावा करत म्हटलं की, विधान परिषदेतील काँग्रेस आमदार धीरज लिंगाडे हे शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. त्यांना पक्षाकडून मोठी ऑफर देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. आगामी निवडणुकीत आमदारकी देण्याचं आश्वासन आणि तब्बल 20 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा दावा राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला.
या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून महाविकास आघाडीतही चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, या आरोपांवर शिंदे गटाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
Published on: Jul 05, 2026 11:48 AM
2029 च्या निवडणुकीबाबत आत्ताच दिला थेट संकेत; पुण्यातील कार्यक्रमात...
लाव रे तो व्हिडीओ... अयोध्येतील कथित चोरी प्रकरणी ठाकरेंनी ऐकवला भाजप
फडणवीसांनी स्पष्ट सांगावं... रामरक्षक की मंदिर लुटारूंच्या बाजूने?
नागपुरात उद्धव ठाकरे यांचे रामरक्षा पठण आंदोलन, शिवसैनिकांची मोठी...

