AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याण गांधारी रिंग रोड की स्टंटबाजांचा अड्डा… अपघातानंतरही नाही आवर

कल्याणमध्ये आता ठिकठिकाणी रस्त्यांची कामे सुरु आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असते. तर दुसरीकडे गांधारी रिंग रोड परिसरात गाड्या सुस्साट पळत असतात... त्यामुळे त्या मार्गावर अपघातांची संख्या देखील वाढली आहे. पण देखील परिस्थिती काही बदलली दिसत नाही.

कल्याण गांधारी रिंग रोड की स्टंटबाजांचा अड्डा...  अपघातानंतरही नाही आवर
| Updated on: Apr 04, 2026 | 12:24 PM
Share

कल्याण येथील गांधारी रिंग रोड की स्टंटबाजांचा अड्डा? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. गांधारी रिंग रोडवर स्टंटबाज तरुणांचा थरार सुरुच आहे. पुलावर भरधाव वेगात बाईक रेसिंग सुरु आहे. ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही दिवसा पूर्वी याच रस्त्यावर अल्पवयीन मुलाकडून कार रेसिंग करत असताना एका निष्पाप सायकल स्वार व्यावसायिकाचा झाला होता मृत्यू मात्र यानंतरही स्टंटबाजी सुरूच. गाड्याच्या आवाजामुळे आणि भरधाव वेगामुळे मॉर्निंग-इव्हनिंग वॉक करणाऱ्या नागरिकाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे….रेसने होत असलेल्या ध्वनीप्रदूषणमुळे परिसरातील नागरिक त्रस्त असून, याचा फटका लहान मुले व वृद्धांना बसत आहे.

गांधारी पुलावर भरधाव वेगाने बाईक चालवत धोकादायक स्टंट आणि रेसिंग केल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. विशेष म्हणजे हा व्हिडिओ काल रात्रीच्या सुमारास शूट झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

या रोडवर आधीही अनेक अपघात झाले असून काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. मात्र, त्यानंतरही स्टंटबाजी थांबलेली नाही. पोलिसांकडून वेळोवेळी कारवाई केली जाते, पण ती तात्पुरतीच ठरत असल्याचं दिसून येत आहे.या स्टंटबाजीमुळे केवळ अपघाताचा धोका नाही, तर मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषणही होत आहे. रिंग रोड परिसरातराहणाऱ्या नागरिकांच्या झोपेचा खोळंबा होत असून लहान मुले दचकून उठतात, तर वयोवृद्ध आणि आजारी व्यक्तींना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

डॉक्टर स्वप्नाली पाटील यांनी पालकांना आवाहन करत सांगितले की, “पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने देणे धोकादायक ठरत आहे. मुलं नेमकी काय करतात, कशी गाडी चालवतात याकडे लक्ष देणं आवश्यक आहे.”

कल्याण सायकलिस्ट ग्रुपच्या पदाधिकारी डॉक्टर रेहनुमा आयते शामुद्दीन यांनी सांगितले की, “या स्टंटबाजीमुळे आमच्या एका सायकलिस्ट मित्राचा मृत्यू झाला आहे. आम्ही पोलिस आणि महापालिकेला वारंवार पत्रव्यवहार केला. काही उपाययोजना झाल्या, पण पुन्हा परिस्थिती तशीच झाली आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे.”दरम्यान, या व्हायरल व्हिडिओनंतर नागरिकांकडून पोलिस प्रशासन आणि पालकांना कठोर कारवाईसाठी आवाहन करण्यात येत आहे.“पालकांनो, जागे व्हा… या स्टंटबाजांमुळे निष्पाप लोकांचा जीव जातोय,” असा संतप्त संदेश नागरिकांकडून दिला जात आहे.

Follow Us
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त