Trupti Desai On Ashok Kharat | अशोक खरात प्रकरणात खळबळ: अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?; तृप्ती देसाईंचा धक्कादायक संशय
भोंदू अशोक खरातने दिवंगत नेते अजित पवार यांच्या फोटोवर फुल्या मारल्या होत्या, तसेच एका बड्या नेत्याचा फोटोही त्यामध्ये असल्याचा संशय व्यक्त केला. यावर प्रतिक्रिया देताना सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी संताप व्यक्त केला. “अजित दादा आता हयात नाहीत. त्यांच्या फोटोवर अशा प्रकारे कृती करणे चुकीचे असून, यामागील दोषींना शिक्षा झाली पाहिजे,” असे त्या म्हणाल्या.
नाशिकचा ज्योतिष विद्या अवगत असल्याचा दावा करणारा भोंदू अशोक खरात सध्या कारागृहात असून, त्याच्यावर महिला अत्याचार, लैंगिक शोषण, फसवणूक आणि पैसे लुबाडण्याचे गंभीर आरोप आहेत. या प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत असून, अनेक राजकीय नेते आणि आमदार त्याला भेटत असल्याची माहितीही पुढे येत आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दावा केला की, भोंदू अशोक खरातने दिवंगत नेते अजित पवार यांच्या फोटोवर फुल्या मारल्या होत्या, तसेच एका बड्या नेत्याचा फोटोही त्यामध्ये असल्याचा संशय व्यक्त केला.
यावर प्रतिक्रिया देताना सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी संताप व्यक्त केला. “अजित दादा आता हयात नाहीत. त्यांच्या फोटोवर अशा प्रकारे कृती करणे चुकीचे असून, यामागील दोषींना शिक्षा झाली पाहिजे,” असे त्या म्हणाल्या. त्यांनी पुढे सांगितले की, अजित पवार अंधश्रद्धेला कधीही बळी पडणारे नव्हते. तसेच, या प्रकरणात एका मोठ्या नेत्याचे नाव समोर येत असून, ते शरद पवार असू शकतात, अशी शंका देसाई यांनी व्यक्त केली. काही राजकीय स्वार्थासाठी काळी जादू, अघोरी पूजा करण्याचं प्रयत्न जर कोणी केला असेल तर त्या नेत्यांवर, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे.
Published on: Apr 03, 2026 03:49 PM
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब

