Sanjay Raut | VSR कंपनीत अदृश्य शक्ती… कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी सातत्याने होत आहे. यंत्रणा तपास करत असल्याचे सांगितले जात असले, तरी 15 दिवस उलटूनही ठोस निष्कर्ष समोर आलेला नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गंभीर दावा केला आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासातून कोणताही ठोस निष्कर्ष बाहेर येणार नाही, असा ठाम दावा राऊत यांनी केला.
अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी सातत्याने होत आहे. यंत्रणा तपास करत असल्याचे सांगितले जात असले, तरी 15 दिवस उलटूनही ठोस निष्कर्ष समोर आलेला नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गंभीर दावा केला आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासातून कोणताही ठोस निष्कर्ष बाहेर येणार नाही, असा ठाम दावा राऊत यांनी केला. रोहित पवार यांनी सादर केलेल्या सादरीकरणातील मुद्द्यांबाबत नेमकं काय घडलं आणि काय घडलं नाही, हे अखेरपर्यंत स्पष्ट होणार नाही, असेही ते म्हणाले. तसेच अजित पवार ज्या VSR कंपनीच्या विमानातून प्रवास करत होते, त्या कंपनीतही काही अदृश्य शक्ती कार्यरत असल्याचा संशय राऊतांनी व्यक्त केला. या कंपनीतील कथित बेनामी गुंतवणूकदार आणिखरे मालक कोण आहेत, याचा आधी सखोल तपास झाला पाहिजे, अशी मागणीही राऊत यांनी केली आहे.
Published on: Feb 14, 2026 11:50 AM
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का

