Sanjay Raut | भाजपचे अदृश्य हात कार्यरत… राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून संजय राऊत यांचं खळबळजनक विधान
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींशी काँग्रेस किंवा शिवसेनेचा काहीही संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमधील विलिनीकरणाचा मुद्दा हा त्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींशी काँग्रेस किंवा शिवसेनेचा काहीही संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमधील विलिनीकरणाचा मुद्दा हा त्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. विलिनीकरण होणार की नाही? झाल्यास अध्यक्ष कोण होणार? हे त्यांचे प्रश्न आहेत. त्यावर आम्ही का बोलावे?, असे म्हणत त्यांनी या विषयावर भाष्य करण्याचे टाळले. मात्र, याचवेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपचा राष्ट्रवादीशी संबंध असू शकतो, असा दावा करत “या सगळ्या राजकारणाची सूत्रे भाजप हलवत आहे,” असा आरोप त्यांनी केला. तसेच अदृश्य शक्ती किंवा अदृश्य हात हे भाजपकडूनच कार्यरत असतात, असा टोला देखील राऊत यांनी लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसमधील विलिनीकरणाच्या चर्चांना वेग आला असताना राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
Published on: Feb 14, 2026 11:12 AM
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात; पहा व्हिडीओ
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल
धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेता

