Devendra Fadnavis | मुंबईत मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
मुंबईत आज सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. मुलुंड येथील मेट्रो बांधकामाच्या कामाच्या दरम्यान एक स्लॅब कोसळला, जो दोन गाड्यांवर पडला. या घटनेत एक व्यक्ती जागीच ठार झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.
मुंबईत आज सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. मुलुंड येथील मेट्रो बांधकामाच्या कामाच्या दरम्यान एक स्लॅब कोसळला, जो दोन गाड्यांवर पडला. या घटनेत एक व्यक्ती जागीच ठार झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. या दुर्घटनेबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले. त्यांनी या घटनेची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून दुर्घटनेचे नेमके कारण समोर येऊ शकेल. फडणवीस म्हणाले की, मृत व्यक्तीच्या कुटुंबाला राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत दिली जाईल, तर जखमी व्यक्तींवरील वैद्यकीय उपचाराचा सर्व खर्चही राज्य सरकार करेल. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
Published on: Feb 14, 2026 06:03 PM
मोठी बातमी! 130 ज्येष्ठ शिवसैनिक ठाकरेंच्या भेटीला, तासभराच्या बैठकीत
शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...
राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर
काय राहिलंय आता? ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान

