AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाऊस पुन्हा कोसळणार! 8 जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी, पुढील 24 तास धोक्याचे, थेट…

IMD Weather Alert : राज्यातील वातावरणात मोठा बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला. आज राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. तापमान सतत चढउतारही बघायला मिळेल.

पाऊस पुन्हा कोसळणार! 8 जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी, पुढील 24 तास धोक्याचे, थेट...
Rain
| Updated on: Mar 14, 2026 | 7:23 AM
Share

हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. उष्णता अधिक तीव्र होत असतानाच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा अंदाज वर्तवला. राज्यात पुढील काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. मार्च महिन्यातही अवकाळी पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. 20 मार्च 2026 पर्यंत राज्यावर अवकाळीचे संकट कायम असणार आहे. शेतकऱ्यांकडून रब्बीचे पिक काढले जात असतानाच अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. हवामानात मोठे बदल बघायला मिळतील. भारतीय हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज पावसाचा येलो अलर्ट जारी केला. यासोबतच काही भागात उष्णता अधिक तीव्र होण्याचा अंदाज आहे. कोकणात उष्ण आणि दमट वातावरण राहण्याचा अंदाज आहे. मागील काही दिवसांपासून अनेक शहरात पारा 40 पार जाताना दिसत आहे. त्यामध्येच पावसाचा इशारा देण्यात आल्याने उष्णतेपासून थोडा दिलासा मिळेल.

धाराशिव, बीड, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, सोलापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड येथे उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. आजही तापमानात चढउतार बघायला मिळेल. जळगाव, वाशिम, चंद्रपूर येथे पारा 40 अंशाच्या पुढे होता. निफाड येथे राज्यातील निचांकी तापमानाची नोंद झाली.

निफाड येथे 13.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. राज्यातील काही भागात कडाक्याचे उष्ण आहे तर काही भागात पाऊस हजेरी लावणार आहे. पुढील काही दिवस राज्यात पाऊस कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि आता मार्च महिन्यातही पाऊस होत आहे. देशातील अनेक राज्यात पाऊस पडत आहे.

नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून उष्णतेची तीव्रता आता अधिक जाणवू लागली आहे. कडक उन्हामुळे नंदुरबार शहरातील नेहमी गजबजलेले मुख्य रस्ते सध्या ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मार्च महिन्यातच नागरिकांना मे महिन्यातील उकाड्याचा अनुभव येत असल्याने जनजीवन काहीसे विस्कळीत झाले आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, तालुका रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मिळून 17 उष्माघात कक्ष तयार करण्यात आले आहेत.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार