Tukaram Munde FDA : दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले लाडू-चिवडे; विक्रेत्यांना दिला इशारा
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांनी अन्न सुरक्षा आणि दर्जाबाबत कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी पुणे येथील एका कार्यक्रमात लाडू-चिवड्याच्या गुणवत्तेची तपासणी केली. भेसळयुक्त खाद्यपदार्थांवर मोठी कारवाई सुरू असून, उत्पादक आणि विक्रेत्यांनी नियमांचे पालन करून सुरक्षित आणि दर्जेदार अन्न पुरवावे, असा थेट इशारा मुंडे यांनी दिला आहे.
दिवाळी सणापूर्वीच महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (एफडीए) सक्रिय झाले आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पुणे येथे एका सार्वजनिक दिवाळी फराळ वाटप कार्यक्रमादरम्यान लाडू आणि चिवड्याच्या गुणवत्तेची स्वतः पाहणी केली. या उपक्रमाचे कौतुक करतानाच त्यांनी तांत्रिक पर्यवेक्षक, नैसर्गिक रंगांचा वापर आणि खुल्यावरील पदार्थांची योग्य विल्हेवाट लावण्याबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या.
मुंडे यांनी या वेळी एफडीएच्या सुरू असलेल्या कारवाईची माहिती दिली. दिवाळीपूर्वी मसाले आणि खाद्यतेलाच्या भेसळीविरोधात राज्यभर मोठी मोहीम राबवण्यात आली, ज्यात हजारो क्विंटल मालाचा साठा जप्त करण्यात आला. यापुढेही अनधिकृत आणि भेसळयुक्त पदार्थांवर कठोर कारवाई सुरूच राहील. विक्रेत्यांनी नियमानुसार, सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यपदार्थ ग्राहकांना पुरवावेत. एफडीएचा कडक पहारा असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. नागरिकांना कोणत्याही संशयाच्या बाबतीत complaints.mahafda.in या पोर्टलवर तक्रार करण्याचे आवाहनही मुंडे यांनी केले.
Published on: Nov 01, 2026 04:08 PM
दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले...
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस
इंडिया अघाडीच्या रॅलीतून भाजप सरकारवर सडकून टीका
ज्ञानेश कुमार यांना हटवेपर्यंत आंदोलन थांबणार नाही...

