AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कसरच सोडली नाही, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं; थेट बड्या नेत्यांची नावं घेत केला घणाघात

कसरच सोडली नाही, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं; थेट बड्या नेत्यांची नावं घेत केला घणाघात

| Updated on: Nov 01, 2026 | 12:51 PM
Share

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांवर लोकशाही व संविधान संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. इंदिरा गांधींच्या काळात संविधानात बदल करून मूलभूत अधिकार कसे गोठवले गेले, याचा दाखला देत फडणवीसांनी काँग्रेसला संविधान चोर म्हटले. लोकशाही वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन त्यांनी केले.

लोकशाही वाचवा, अराजकता हटवा या पदयात्रेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि त्यांच्या बगलबच्च्यांवर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेसने देशातील लोकशाही संपवून अराजकता आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. ही लढाई भाजपची किंवा एनडीएची नसून, ती भारताच्या संविधानाच्या रक्षणाची असल्याचे फडणवीस यांनी अधोरेखित केले. फडणवीस यांनी काँग्रेसच्या इतिहासाकडे लक्ष वेधले.

1975 साली अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधींची निवडणूक भ्रष्ट मार्गाने जिंकल्याचा निकाल दिला होता. त्यावेळी काँग्रेसने संविधानात संशोधन करून न्यायालयाला पंतप्रधानाच्या निवडणुकीवर निर्णय देण्यापासून रोखले, तसेच मूलभूत अधिकार गोठवले, असा दावा त्यांनी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागरिकांना दिलेले मूलभूत अधिकार काँग्रेसने संपवले, असे फडणवीस म्हणाले. संविधान चोर हे रस्त्यावर उतरले असून, संविधानाचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी रस्त्यावर उतरावे, असे आवाहन त्यांनी केले.

Published on: Nov 01, 2026 12:51 PM

Follow Us