AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhantrayodashi 2026: धनत्रयोदशीच्या रात्री घरात कुठे कुठे लावावे दिवे? जाणून घ्या प्रत्येक दिव्याचे धार्मिक महत्त्व

धनत्रयोदशीच्या रात्री घरात १३ दिवे लावण्याची जुनी परंपरा आहे. या परंपरेला यम दीपम असेही म्हटले जाते. घरातील वेगवेगळ्या ठिकाणी हे दिवे लावल्याने सुख-समृद्धी टिकून राहते आणि संकटांपासून संरक्षण मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे.

Dhantrayodashi 2026: धनत्रयोदशीच्या रात्री घरात कुठे कुठे लावावे दिवे? जाणून घ्या प्रत्येक दिव्याचे धार्मिक महत्त्व
| Edited By: | Updated on: Nov 01, 2026 | 6:35 PM
Share

धनत्रयोदशीच्या रात्री घरात १३ दिवे लावण्याची जुनी परंपरा आहे. या परंपरेला यम दीपम असेही म्हटले जाते. घरातील वेगवेगळ्या ठिकाणी हे दिवे लावल्याने सुख-समृद्धी टिकून राहते आणि संकटांपासून संरक्षण मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे.

हिंदू धर्मात धनत्रयोदशी या सणाला विशेष महत्त्व आहे. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला हा सण साजरा केला जातो. समुद्र मंथनाच्या वेळी याच दिवशी भगवान धन्वंतरी प्रकट झाले होते, अशी धार्मिक मान्यता आहे. धनत्रयोदशीच्या रात्री घरात एकूण १३ दिवे लावण्याची जुनी परंपरा आहे. या परंपरेला यम दीपम असेही म्हणतात. घराच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये हे १३ दिवे लावल्याने घरात सुख-समृद्धी राहते आणि संकटांची भीती दूर होते, असे मानले जाते. जाणून घेऊया धनत्रयोदशीला हे १३ दिवे नेमके कुठे लावावेत आणि प्रत्येक दिव्याचे धार्मिक महत्त्व काय आहे.

धनत्रयोदशीला दिवे कुठे कुठे लावावेत?

या खास रात्री सर्वात पहिला दिवा देवघरात लावावा. हा दिवा आपल्या इष्ट देवतेला समर्पित केला जातो. त्यानंतर दुसरा दिवा घराच्या ईशान्य दिशेला ठेवावा. ही घरातील सर्वात पवित्र दिशा मानली जाते. या दिशेला देवी-देवतांचा वास असतो आणि त्यामुळे त्यांची कृपा प्राप्त होते, अशी धार्मिक मान्यता आहे.

तिसरा दिवा तुळशीजवळ लावावा. तुळशीमध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा वास असतो, असे मानले जाते. त्यानंतर चौथा दिवा घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना ठेवावा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि नकारात्मक ऊर्जा घराबाहेरच राहते, अशी श्रद्धा आहे.

दक्षिण दिशा आणि ब्रह्मस्थानावर लावा दिवा

पाचवा दिवा घराच्या दक्षिण दिशेला लावावा. दक्षिण दिशा यम देवाची दिशा मानली जाते. या ठिकाणी दिवा लावल्याने अकाली मृत्यूची भीती मनातून दूर होते, अशी धार्मिक मान्यता आहे. सहावा दिवा घराच्या ब्रह्मस्थानावर म्हणजेच घराच्या मध्यभागी ठेवावा. यामुळे घरातील सर्व ऊर्जा संतुलित राहण्यास मदत होते, असे मानले जाते.

सातवा दिवा घरातील शौचालयाच्या बाहेर लावावा. यामुळे त्या ठिकाणची नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे निष्क्रिय होते, अशी श्रद्धा आहे. आठवा दिवा घराच्या बाल्कनीमध्ये किंवा छतावर ठेवावा. तर नववा दिवा घरातील भंगार किंवा अडगळीच्या वस्तू ठेवण्याच्या खोलीजवळ लावावा. यामुळे घरातील दारिद्र्य दूर होते, अशी धार्मिक मान्यता आहे.

चौक, पिंपळ, बेलाचे रोप आणि खिडक्यांजवळ दिवे

दहावा दिवा घरा जवळील चौकात ठेवावा. यामुळे मार्गातील अडथळे दूर होतात, अशी धार्मिक मान्यता आहे. अकरावा दिवा घरा जवळील पिंपळाच्या झाडाखाली लावावा. यामुळे पितरांचे आशीर्वाद मिळतात, असे मानले जाते. बारावा दिवा घरात असलेल्या बेलाच्या रोपाजवळ ठेवावा. हे अत्यंत शुभ मानले जाते. त्यानंतर तेरावा आणि शेवटचा दिवा घराच्या खिडक्यांजवळ लावावा. धनत्रयोदशीच्या रात्री या सर्व ठिकाणी दिवे लावल्याने घराचा प्रत्येक कोपरा प्रकाशाने उजळतो आणि जीवनातील अडचणी दूर होतात, असे मानले जाते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय...
Satara Rain : साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद
पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री थेट.. नेमकं काय घडलं?
Eknath Shinde On Purnekar Case : पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट...; नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; ऑडिओ क्लिप व्हायरल
Sushil Karad : वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; पीडित महिलेला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल
आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार....
Rahul Gandhi : आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार; संपूर्ण भाषण पाहा
नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव...
Tejashwi Yadav : नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव यांचा थेट सवाल
शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही....
Eknath Shinde : शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी ग्वाही
शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती...
Ram Purnekar : शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती; राम पूर्णेकर असं का म्हणाले?
दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले...
Tukaram Munde FDA : दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले लाडू-चिवडे; विक्रेत्यांना दिला इशारा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस्वरूपी सुरक्षा देण्याची विनंती
इंडिया अघाडीच्या रॅलीतून भाजप सरकारवर सडकून टीका
Delhi INDIA Alliance Rally : इंडिया अघाडीच्या रॅलीतून भाजप सरकारवर सडकून टीका