AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोण आहेत वृंदावनचे ‘Gen Z बाबा’? १९व्या वर्षी बनले भागवत कथाकार, लूकमुळे सोशल मीडियावर व्हायरल

Gen Z Baba : सोशल मीडियावर सध्या वृंदावनमधील १९ वर्षीय शाश्वत आचार्य महाराज यांची जोरदार चर्चा सुरू आहे. खांद्यापर्यंत कुरळे केस, पांढरा कुर्ता आणि कपाळावर वैष्णव टिळा अशा त्यांच्या लूकमुळे नेटकऱ्यांनी त्यांना ‘जेन झी बाबा’ असे नाव दिले आहे. मात्र, त्यांच्या लोकप्रियतेमागे केवळ लूक नसून वयाच्या चौथ्या वर्षापासून सुरू झालेला भागवत कथा वाचनाचा प्रवासही आहे.

कोण आहेत वृंदावनचे ‘Gen Z बाबा’? १९व्या वर्षी बनले भागवत कथाकार,  लूकमुळे सोशल मीडियावर व्हायरल
| Edited By: | Updated on: Nov 01, 2026 | 6:29 PM
Share

सोशल मीडियावर दररोज अनेक जण वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येतात. सध्या वृंदावनमधील एका तरुण महाराजांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. अवघे १९ वर्षे वय असलेल्या या महाराजांना नेटकरी ‘जेन झी बाबा’ (Gen Z Baba) म्हणत आहेत. त्यांचे नाव शाश्वत आचार्य महाराज असून, त्यांच्या कुरळ्या केसांचा, साध्या राहणीमानाचा आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्त्वाचा सोशल मीडियावर दबदबा आहे. इतक्या कमी वयात ते भागवत कथाकार म्हणून ओळखले जातात. जाणून घेऊया कोण आहेत शाश्वत आचार्य महाराज आणि त्यांचा आध्यात्मिक प्रवास कसा आहे.

कोण आहेत शाश्वत आचार्य महाराज?

श्री स्वामी शाश्वत आचार्य जी महाराज यांचा जन्म ५ ऑगस्ट २००७ रोजी वृंदावन येथे झाला. त्यांचे वडील स्वामी वृंदावन आचार्य जी महाराज हे देखील संत आहेत. शाश्वत आचार्य हे वृंदावनमधील श्री धाम गोदा विहार मंदिराचे पीठाधीश्वर आहेत. त्यांचे बालपण धार्मिक वातावरणात गेले असून, लहानपणापासूनच त्यांना भजन, कीर्तन आणि धार्मिक ग्रंथांची आवड होती.

वयाच्या चौथ्या वर्षापासून भागवत कथा वाचन

शाश्वत आचार्य यांचा धार्मिक क्षेत्रातील प्रवास अगदी लहान वयातच सुरू झाला. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, इतर मुले खेळण्यांमध्ये रमलेली असताना ते वयाच्या चौथ्या वर्षी भगवद्गीतेतील श्लोक म्हणत असत. एवढेच नव्हे, तर वयाच्या चौथ्या वर्षापासूनच त्यांनी व्यासपीठावर बसून छोट्या कथा आणि प्रवचन देण्यास सुरुवात केली होती. हळूहळू त्यांच्या कथा वाचनाची शैली आणि ज्ञानामुळे श्रोत्यांची संख्या वाढत गेली.

शिक्षण आणि दीक्षेची प्रक्रिया सुरू धार्मिक कार्यासोबतच शाश्वत आचार्य शिक्षणही घेत आहेत. उपलब्ध माहितीनुसार, त्यांचे शिक्षण मथुरा येथील गिरिराज महाराज लॉ कॉलेजमध्ये बीए-एलएलबी अभ्यासक्रमासाठी सुरू असल्याचे सांगितले जाते. त्यांचे मामा आशुतोष शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या ते शिक्षण आणि दीक्षेशी संबंधित प्रक्रिया पूर्ण करत आहेत. ते आपल्या कुटुंबासोबत वृंदावनमध्ये राहतात.

सोशल मीडियावर ‘जेन झी बाबा’ म्हणून लोकप्रिय

शाश्वत आचार्य यांच्या सोशल मीडिया लोकप्रियतेमागे त्यांचा वेगळा लूक हेही एक कारण आहे. खांद्यापर्यंत कुरळे केस, पांढरा कुर्ता, कपाळावर वैष्णव टिळा आणि शांत स्वभाव यामुळे ते नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. सोशल मीडियावर अनेक जण त्यांना ‘Gen Z Baba’ तर काही जण ‘Facecardaeshwar Guruji’ असे म्हणत आहेत. त्यांच्या कमी वयामुळे आणि आध्यात्मिक जीवनशैलीमुळे तरुणांमध्येही त्यांच्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

Follow Us
साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय...
Satara Rain : साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद
पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री थेट.. नेमकं काय घडलं?
Eknath Shinde On Purnekar Case : पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट...; नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; ऑडिओ क्लिप व्हायरल
Sushil Karad : वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; पीडित महिलेला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल
आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार....
Rahul Gandhi : आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार; संपूर्ण भाषण पाहा
नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव...
Tejashwi Yadav : नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव यांचा थेट सवाल
शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही....
Eknath Shinde : शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी ग्वाही
शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती...
Ram Purnekar : शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती; राम पूर्णेकर असं का म्हणाले?
दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले...
Tukaram Munde FDA : दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले लाडू-चिवडे; विक्रेत्यांना दिला इशारा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस्वरूपी सुरक्षा देण्याची विनंती
इंडिया अघाडीच्या रॅलीतून भाजप सरकारवर सडकून टीका
Delhi INDIA Alliance Rally : इंडिया अघाडीच्या रॅलीतून भाजप सरकारवर सडकून टीका