AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ruchita Jadhav : मी पैशांसाठी लग्न…71 स्थळं नाकारली, 72 व्या स्थळाला दिला होकार; रुचिता जाधव स्पष्टच बोलली

Ruchita Jadhav : रुचिता जाधवनं नुक्त्याच एका मुलाखतीत लग्नाबद्दल भाष्य केलं आहे.

Ruchita Jadhav : मी पैशांसाठी लग्न...71 स्थळं नाकारली, 72 व्या स्थळाला दिला होकार; रुचिता जाधव स्पष्टच बोलली
| Updated on: Nov 01, 2026 | 6:18 PM
Share

मराठी अभिनेत्री रुचिता जाधवनं 2021 मध्ये उद्योगपती आनंद मानेसोबत लग्न केलं. आनंदसोबत लग्न करण्यापूर्वी रुचितानं 71 स्थळं नाकारली. रुचिताला सासरच्यांकडून खूप सपोर्ट मिळाला. कुटुंबाला वेळ देण्यासाठी अभिनेत्रीनं इंडस्ट्रीतून ब्रेक घेण्याचं ठरवलं. आनंद माने रिअल इस्टेटमध्ये असल्यामुळे अभिनेत्रीनं पैशांसाठी लग्न केलं, असं म्हटलं गेलं. यावर आता अभिनेत्रीनं भाष्य केलं आहे.

काय म्हणाली रुचिता जाधव?

रुचिता म्हणाली की, ‘मी आनंदशी पैशांसाठी लग्न केलं, असं बोललं जातं. बरं, लोकांनी याबद्दलच्या असंख्य कमेंट्स माझ्या सोशल मीडियावर केल्या होत्या. मी एक-एक कमेंट डिलीट करून शेवटी मग कमेंट सेक्शन ऑफ करून टाकलं. खरंच कुटुंबीयांनासुद्धा याचा खूप फरक पडतो. आता माझी आई ६० वर्षांची आहे. ती माझ्या फोटोंवरच्या सगळ्या कमेंट्स वाचते. त्यात मी तिची सगळ्यात लाडकी मुलगी आहे. आता मला त्या कमेंट्सचा फरक पडत नाही पण, माझ्या आईला या गोष्टी फार अफेक्ट होतात. ‘मी पैशांसाठी लग्न केलं’ या अशा पद्धतीच्या कमेंट्स वाचून मला कळतच नाही की, मी यावर हसू, काय उत्तर देऊ? नेमकं काय बोलू? कारण, माझं अरेंज मॅरेज आहे. त्यामुळे थोडंतरी डोकं वापरा, अरेंज मॅरेज सेटअपमध्ये तुम्ही ज्या सोशल स्ट्रक्चरमध्ये मोठे झाला आहात, त्याच पद्धतीचं स्थळ मिळतं.’

‘माझी फॅमिली काहीतरी होती, मी काहीतरी होते म्हणून मला आनंद मानेंचं स्थळ आलं, व्हेरी सिंपल! मी आजपर्यंत कधीही प्रेमात पडलेली मुलगी नाहीये. कधीच नाही. लहानपणापासून आम्हाला सांगितलं गेलं होतं, तुम्हाला सगळं फ्रिडम आहे पण, लग्नासाठी मुलगा शोधणार आम्हीच. फक्त मुलींनाच नाही माझ्या भावाला सुद्धा स्थळ आई-बाबांनीच आणलं. तर, मी का कोणासाठी पैशांसाठी लग्न करेन? बरं, तो पण उगाच माझ्याशी का लग्न करेल? माझी फॅमिली सुद्धा काहीतरी आहे, म्हणूनच त्यांच्या कुटुंबाने सुद्धा माझा विचार केला.’

‘अरेंज मॅरेज हे असंच असतं आणि मी हे लोकांना कसं काय समजावू? त्यापेक्षा मग मी म्हणते, ठिक आहे समजायचं ते समजा. केलं पैशांसाठी लग्न. माझ्या सासरचे लोक सुद्धा या कमेंट्स वाचतात. पण, ते कधीच बोलून दाखवत नाहीत. सासू-सासरे म्हणून त्यांनाही माझी काळजी आहे. एकंदर काय तर, ते ट्रोलिंग, त्या कमेंट्स या सगळ्या गोष्टी फॅमिलीला अफेक्ट करतात.’ असं रुचिता शेवटी म्हणाली. ‘राजश्री मराठी‘ला दिलेल्या मुलाखतीमध्ये रुचिता बोलत होती.

Follow Us
पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री थेट.. नेमकं काय घडलं?
Eknath Shinde On Purnekar Case : पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट...; नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; ऑडिओ क्लिप व्हायरल
Sushil Karad : वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; पीडित महिलेला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल
आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार....
Rahul Gandhi : आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार; संपूर्ण भाषण पाहा
नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव...
Tejashwi Yadav : नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव यांचा थेट सवाल
शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही....
Eknath Shinde : शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी ग्वाही
शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती...
Ram Purnekar : शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती; राम पूर्णेकर असं का म्हणाले?
दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले...
Tukaram Munde FDA : दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले लाडू-चिवडे; विक्रेत्यांना दिला इशारा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस्वरूपी सुरक्षा देण्याची विनंती
इंडिया अघाडीच्या रॅलीतून भाजप सरकारवर सडकून टीका
Delhi INDIA Alliance Rally : इंडिया अघाडीच्या रॅलीतून भाजप सरकारवर सडकून टीका
ज्ञानेश कुमार यांना हटवेपर्यंत आंदोलन थांबणार नाही...
Delhi INDIA Alliance Rally : ज्ञानेश कुमार यांना हटवेपर्यंत आंदोलन थांबणार नाही... राहुल गांधींचा निर्धार; रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची महारॅली