Viral Video : गुलाबजाम खाण्याआधी हे बघाच, माशांच्या ट्रेमध्येच कामगाराचा किळसवाणा प्रकार; घाणेरड्या हातांनी…
गुलाबजाम म्हटलं कि अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. त्यातही आत मलाई असलेला गुलाबजाम खायला मिळाला तर काय सांगायलाच नको! पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱा व्हिडिओ पाहिल्यानंतर किळस आल्याशिवाय राहणार नाही

गुलाबजाम म्हटलं कि अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. त्यातही आत मलाई असलेला गुलाबजाम खायला मिळाला तर काय सांगायलाच नको! पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱा व्हिडिओ पाहिल्यानंतर किळस आल्याशिवाय राहणार नाही. कारण या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती चक्क जमिनीवर बसून गुलाबजाममध्ये हाताने मलाई भरताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीसमोर मिठाईच्या दोन ट्रे ठेवलेले दिसतात. एका ट्रेमध्ये साधे गुलाबजामुन आहेत, तर दुसऱ्या ट्रेमध्ये मलाई भरलेले गुलाबजामून ठेवलेले दिसतात. ही व्यक्ती हाताने एकेक गुलाबजामून घेते आणि त्यामध्ये मलाई भरून बाजूला ठेवते. मात्र त्याचे हात अतिशय घाणेरडे दिसत आहेत. त्या ट्रेमध्ये, त्याच्या हातावर अनेक माश्या फिरताना दिसत आहेत.व्हिडिओ बघूनच किळस येतोय. ही व्यक्ती हातावर मलाई घेऊन गुलाबजाममध्ये भरताना दिसत आहे.
Homemade sweets are always the safer and better choice. Watch this video and you’ll lose your appetite instantly. This festive season, make your sweets at home skip the outside ones. 🤮 #HomemadeSweets #FestiveSeason #EatClean https://t.co/m6jNxITFN0
— ಸನಾತನ (सनातन) (@sanatan_kannada) October 28, 2026
अशी मिठाई खाणे म्हणजे थेट आजाराला आमंत्रण देण्यासारखे आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर काहींनी अशी मिठाई खावून आजाराला निमंत्रण देण्यापेक्षा ड्रायफ्रुट्स खाण्याचे सल्ले दिले आहेत. तर काही नेटकऱ्यांनी त्या दुकानावर आणि त्या व्यक्तीवर तात्काळ कारावाईची मागणी केली आहे. हा व्हिडिओ कुठला आहे, कोणी शेअर केला आहे, याची अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
विशेष म्हणजे मलाई आणि खवा यांसारखे दुधापासून तयार होणारे पदार्थ वापरताना अधिक काळजी घेणं आवश्यक असतं. अशा पदार्थांची योग्य तापमानात साठवणूक आणि स्वच्छ भांड्यांमध्ये हाताळणी महत्त्वाची असते. दुधाच्या मिठाईंवर माश्या बसण्याचे प्रमाण जास्त असते.त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे.
लक्षात ठेवा, दिवाळी येते आहे त्यासोबत मिठाई तर येणारचं. मिठाई कशी बनवली असेल, त्यात काय काय वापरलं असेल? याची खात्री करूनच मिठाई खा. अतिप्रमाणा आणि जा्स्त रंगीबेरंगी मिठाई, घाणेरड्या पद्धतीने केलेली मिठाई ही हॉस्पीटलात अॅडमिट व्हायला लावू शकते
