AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आठ सराफांना लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने खंडणीचे पत्र, …तर दुकाना बाहेर जय श्रीराम लिहिण्याचे आदेश

नागपुरातील 8 सराफा व्यापाऱ्यांना लॉरेन बिस्नोईच्या नावाने खंडणीचे पत्र पाठविण्यात आले आहे. या पत्रामुळे व्यापाऱ्यांमध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भितीचे सावट पसरले आहे.

आठ सराफांना लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने खंडणीचे पत्र, ...तर दुकाना बाहेर जय श्रीराम लिहिण्याचे आदेश
Lawrence Bishnoi
| Updated on: Nov 01, 2026 | 5:46 PM
Share

एकीकडे बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर हल्ल्याच्या प्रकरणानंतर चर्चेत असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याची गँगचा नवा प्रताप समोर आला आहे. नागपूरातील आठ सराफांनी त्यांना लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने खंडणीसाठी पत्र आल्याची तक्रार ऑल इंडिया ज्वेलरी असोशिएशनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर गोळीबार केल्यानंतर या हल्ल्याची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने घेतली होती. या हल्ल्यात टायगर श्रॉफचा चालक आणि एक रिक्षावाला जखमी झाले होते. या हल्ल्यात टायगर श्रॉफ थोडक्यात बचावल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणात राजस्थानातील कोटा येथून हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात समाजमाध्यमावर पोस्ट करुन जबाबदारी स्वीकारणारा पंडित याला वॉण्टेड आरोपी म्हणून जाहीर करण्यात आले आहे. आता या प्रकरणात एकूण ११ आरोपींनी अटक करण्यात आली आहे.या प्रकरणाचा तपास सुरु असताना आता नवीन घडामोड उघडकीस आली आहे.

नागपूरातील आठ ज्वेलर्सना गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या नावाने खंडणीचे पत्र आले आहे. यात सोने व्यापाऱ्यांकडून प्रत्येकी १० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची, गोळी घालण्याची आणि कापून टाकण्याची भाषा या पत्रात करण्यात आली आहे.टायगर श्रॉफ याच्यावर ज्याप्रमाणे हल्ला करण्यात आल्या, त्याप्रमाणे तुमच्यावर हल्ला करू अशी धमका या पत्रात करण्यात आली आहे. हे पत्र पोस्टाने आले असून त्याची सत्यता आता पटवण्याचे काम सुरु आहे.

नागपूर येथील सराफांना खंडणीसाठी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्याकडून धमक्या आल्या आहेत. या व्यापाऱ्यांकडून प्रत्येकी दहा लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. काही व्यापाऱ्यांना तीन दिवस तर काही व्यापाऱ्यांना 5 दिवसांचा अवधी खंडणीसाठी देण्यात आला आहे. खंडणी देण्यास तयार असल्यास दुकानाच्या बाहेर ‘जय श्रीराम लिहा’ , आम्ही तुमच्यापर्यंत येऊ असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

ऑल इंडिया ज्वेलरी असोशिएशनने या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून माहिती दिली आहे. तसेच या प्रकरणात नागपूर पोलीस आयुक्तांकडे तक्रार देखील करण्यात आली आहे. या संदर्भात पोलिसांनी व्यापाऱ्यांनी घाबरून जाता, सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. या संदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला असल्याची माहिती ऑल इंडिया ज्वेलरी असोसिएशनचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी दिली आहे.

Follow Us
आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार....
Rahul Gandhi : आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार; संपूर्ण भाषण पाहा
नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव...
Tejashwi Yadav : नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव यांचा थेट सवाल
शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही....
Eknath Shinde : शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी ग्वाही
शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती...
Ram Purnekar : शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती; राम पूर्णेकर असं का म्हणाले?
दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले...
Tukaram Munde FDA : दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले लाडू-चिवडे; विक्रेत्यांना दिला इशारा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस्वरूपी सुरक्षा देण्याची विनंती
इंडिया अघाडीच्या रॅलीतून भाजप सरकारवर सडकून टीका
Delhi INDIA Alliance Rally : इंडिया अघाडीच्या रॅलीतून भाजप सरकारवर सडकून टीका
ज्ञानेश कुमार यांना हटवेपर्यंत आंदोलन थांबणार नाही...
Delhi INDIA Alliance Rally : ज्ञानेश कुमार यांना हटवेपर्यंत आंदोलन थांबणार नाही... राहुल गांधींचा निर्धार; रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची महारॅली
कसरच सोडली नाही, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं; थेट बड्या...
कसरच सोडली नाही, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं; थेट बड्या नेत्यांची नावं घेत केला घणाघात
एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!