AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BAN vs PAK : बांगलादेशचा सामन्यासह मालिका विजय, पाकिस्तानचा 11 धावांनी धुव्वा, सलमान आघाचं शतक व्यर्थ

Bangladesh vs Pakistan 3rd Odi Match Result : बांगलादेशने पाकिस्तानला तिसऱ्या सामन्यात 11 धावांनी पराभूत केलं. बांगलादेशने यासह घरच्या मैदानात पाकिस्तानचा टी 20i मालिकेत धुव्वा उडवला.

BAN vs PAK : बांगलादेशचा सामन्यासह मालिका विजय, पाकिस्तानचा 11 धावांनी धुव्वा, सलमान आघाचं शतक व्यर्थ
Bangladesh Clinch Series against PakistanImage Credit source: Social Media
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 16, 2026 | 3:28 AM
Share

बांगलादेश क्रिकेट टीमने पाकिस्तान विरुद्ध रविवारी 15 मार्च रोजी तिसर्‍या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात 11 धावांनी विजय मिळवला आहे. बांगलादेशने या विजयासह 3 सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने आपल्या नावावर केली आहे. बांगलादेशने पाकिस्तानसमोर 291 धावांचं आव्हान ठेवलं होतं. सलमान आघा याने शतक झळकावून पाकिस्तानला विजयी धावांजवळ आणून ठेवलं होतं. त्यामुळे सामना रंगतदार स्थितीत आला होता. मात्र सलमान आघा आउट झाल्यानंतर पाकिस्तानच्या एकाही फलंदाजांला पाकिस्तानला सुरक्षितपणे विजयापर्यंत पोहचवता आलं नाही. पाकिस्तानच्या फलंदाजांनी बांगलादेशच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. त्यामुळे पाकिस्तानला विजयी धावांचा पाठलाग करताना ऑलआऊट 279 धावा करत आल्या. बांगलादेशने अशाप्रकारे सामन्यासह मालिका आपल्या नावावर केली.

तांझिद हसन तमिम आणि तास्किन अहमद या दोघांनी बांगलादेशच्या विजयात प्रमुख योगदान दिलं. तर इतरांनीही आपली भूमिका चोखपणे पार पाडली. तांझिदने एकदिवसीय कारकीर्दीतील पहिलंवहिलं शतक झळकावलं. तांझिदच्या शतकामुळे बांगलादेशला 290 धावांपर्यंत पोहचता आलं. तर त्यानंतर तास्किनने सर्वाधिक 4 विकेट्स घेत पाकिस्तानला बॅकफुटवर ढकलण्याचं काम केलं.

सामन्यात काय झालं?

उभयसंघातील सामन्याचं आयोजन हे ढाक्यातील शेरे ए बांगला नॅशनल स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. बांगलादेशने 50 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 290 धावा केल्या. बांगलादेशसाठी तांझिंद याने सर्वाधिक धावा केल्या. तांझिदने 107 धावांची खेळी केली. तसेच लिटन दास याने 41 आणि तॉहिद हृदॉय याने 48 धावांचं योगदान दिलं. तर पाकिस्तानसाठी हारिस रौफ याने 3 विकेट्स मिळवल्या.

पाकिस्तानची बॅटिंग

बांगलादेशने विजयी धावांचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानला झटपट 3 झटके दिले. त्यामुळे पाकिस्तानच्या दुसऱ्या सामन्यातील विजयाचा हिरो ठरलेला माज सदाकत आणि साहिबजादा फरहान ही सलामी जोडी ढेर झाली. त्यामुळे पाकिस्तानची स्थिती 3 आऊट 17 अशी झाली. त्यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजांनी छोटेखानी भागीदारी करुन सामन्यातील आव्हान कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र पाकिस्तानची स्थिती 5 आऊट 82 अशी झाली.

सलमान आघाची शतकी खेळी

त्यानंतर सलमान आघा याने शतक झळकावून पाकिस्तानचा डाव सावरला. इतकंच नाही तर सलमानने पाकिस्तानला जवळपास विजयाजवळ आणून ठेवलं. मात्र आघा 48 व्या ओव्हरमध्ये आऊट झाला. आघा आऊट झाला तेव्हा पाकिस्तानला 30 धावांची गरज होती. मात्र बांगलादेशच्या गोलंदाजांसमोर पाकिस्तानला विजयी आव्हानापर्यंत पोहचता आलं नाही.  अशाप्रकारे बांगलादेशने सामना जिंकला. तर शतकवीर तंझिद मॅन ऑफ द मॅटचच ठरला.  तसेच तंझिम आणि नाहिद राणा हे दोघे ‘मॅन ऑफ द सीरिज’ ठरले.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल