AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जरांगे पाटलांच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; थेट म्हणाले कोर्टात...

जरांगे पाटलांच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; थेट म्हणाले कोर्टात…

| Updated on: Aug 06, 2026 | 2:30 PM
Share

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अलीकडेच माध्यमांसी सवंदा साधला यावेळी त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अलीकडेच माध्यमांसी सवंदा साधला यावेळी त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे यांच्या भूमिकेवर भाष्य करत जात पडताळणी समितीच्या कामकाजाबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. प्रमाणपत्र रद्द करण्याच्या प्रक्रियेत राज्य सरकारचा कोणताही हस्तक्षेप नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रमाणपत्र जात पडताळणी समितीकडे गेल्यानंतर समिती सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काम करते. त्यामुळे या प्रक्रियेत सरकार हस्तक्षेप करत नाही. किती प्रमाणपत्र रद्द झाली याची आपल्याला माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितले.

वेगवेगळ्या प्रकारची अनेक प्रमाणपत्रे समितीकडे येतात आणि त्यापैकी सुमारे 10 ते 12 टक्के प्रमाणपत्रे रद्द होतात, असे फडणवीस यांनी सांगितले. यामध्ये नॉन-कुणबी प्रमाणपत्रांचाही समावेश असतो. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे प्रमाणपत्रे रद्द केली जातात. हे जाणीवपूर्वक केले जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अन्याय झाल्याचे वाटत असल्यास अपील करता येईल, असेही फडणवीस म्हणाले. समितीने दाखवलेल्या त्रुटींची पूर्तता करण्याची संधी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सत्तेत असूनही भाजपच्या अनेक नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांची प्रमाणपत्रे रद्द झाली आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Published on: Aug 06, 2026 02:29 PM

Follow Us