AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BAN vs PAK : बांगलादेशच्या ओपनरचा शतकी तडाखा, पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई, 11 वर्षांआधीचा रेकॉर्ड ब्रेक

Tanzid Hasan Tamim : तांझिद हसन तमिम याने पाकिस्तान विरुद्ध अटीतटीच्या सामन्यात शतक झळकावत बांगलादेशला भक्कम धावसंख्येपर्यंत पोहचवण्यात प्रमुख भूमिका बजावली. तसेच तांझिदने या दरम्यान मोठा विक्रम आपल्या नावावर केला.

BAN vs PAK : बांगलादेशच्या ओपनरचा शतकी तडाखा, पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई, 11 वर्षांआधीचा रेकॉर्ड ब्रेक
Tanzid Hasan Tamim Century BAN vs PAK 3rd OdiImage Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 15, 2026 | 8:46 PM
Share

पाकिस्तानने 13 मार्चला दुसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात बांगलादेशवर 100 पेक्षा अधिक धावांच्या फरकाने मात केली. पाकिस्तानने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. तर तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात बांगलादेशच्या सलामीवीर फलंदाजाने शतकी खेळी करत पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केली. पाकिस्तानने या सामन्यात टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. ढाक्यातील शेरे ए बांगला स्टेडियममध्ये आयोजित सामन्यात बांगलादेशने 50 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 290 धावांपर्यंत मजल मारली. बांगलादेशला 290 धावांपर्यंत पोहचवण्यात ओपनर तांझिद हसन तमीन याने प्रमुख भूमिका बजावली. तांझिदने पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई करत शतक झळकावलं. तसेच तांझिदने या खेळीसह मोठा विक्रम मोडीत काढला.

तांझिदने पाकिस्तान विरुद्ध 100 च्या स्ट्राईक रेटने 107 बॉलमध्ये 107 रन्स केल्या. तांझिदने या खेळीत 6 चौकार आणि 7 षटकार लगावले. तांझिदने या 7 षटकारांसह मोठा विक्रम आपल्या नावावर केला.

पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी

तांझिदने सेफ हसन याच्यासह बांगलादेशसाठी सलामी शतकी भागीदारी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 105 धावांची भागीदारी करत बांगलादेशला भक्कम सुरुवात मिळवून दिली. सेफ आऊट झाल्याने सेट जोडी फुटली. त्यानंतर तांझिदने एक बाजू लावून धरुन बांगलादेशचा स्कोअरबोर्ड हलता ठेवला.

तांझिदने या दरम्यान एकदिवसीय कारकीर्दीतील अनेक दिवसांची प्रतिक्षा संपवली. तांझिदने तिसाव्या एकदिवसीय सामन्यात पहिलंवहिलं शतक झळकावलं. मात्र तांझिद शतकांनतर ही खेळी मोठी करण्यात अपयशी ठरला. तांझिद 107 धावांवर बाद झाला.

तांझिद बांगलादेशसाठी पाकिस्तान विरुद्ध एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकार लगावणारा फलंदाज ठरला. तांझिदने याबाबतीत सौम्य सरकार याला पछाडलं.सौम्य सरकार याने 2015 साली पाकिस्तान विरुद्ध नाबाद 127 धावांची खेळी केली होती. सौम्यने त्या खेळीत 6 षटकार लगावले होते.

तांझिद हसन तमीमचा शतकी तडाखा

पाकिस्तान विरुद्ध वनडे सर्वाधिक षटकार लगावणारे बांगलादेशी फलंदाज

तांझिद हसन तमीम : 7 सिक्स, (2026)

सौम्य सरकार : 6 सिक्स, (2015)

तांझिद हसन तमीम : 5 सिक्स, (2026)

अनामुल हक : 4 सिक्स, (2014)

तमीम इक्बाल : 3 सिक्स, (2015)

कोण जिंकणार मालिका?

दरम्यान बांगलादेशने पाकिस्तानसमोर 291 धावांचं आव्हान ठेवलं आहे. हा सामना जिंकणारा संघ मालिकाही जिंकेल. त्यामुळे आता पाकिस्तान सलग दुसऱ्या विजयासह  मालिका आपल्या नावावर करण्यात यशस्वी ठरणार की यजमान बांगलादेश सीरिजवर नाव कोरणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल