AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सप्टेंबरमध्ये मोठा निर्णय! अभिजीत दिपकेंनी सांगितली CJP ची पुढील रणनीती

सप्टेंबरमध्ये मोठा निर्णय! अभिजीत दिपकेंनी सांगितली CJP ची पुढील रणनीती

| Updated on: Aug 06, 2026 | 3:40 PM
Share

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये CJP ची दोन दिवसीय बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत महत्त्वाची चर्चा झाली. पक्षाची ध्येय आणि आगामी दिशा सप्टेंबर महिन्यात निश्चित होणार असल्याचे अभिजीत दिपके यांनी सांगितले.

अभिजीत दिपके म्हणाले, “25 जुलैला या देशाच्या तरुणांनी हे करून दाखवलं ते बारा वर्षात कोणालाही करता आलं नाही. जे सरकार म्हणत होती या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत ते करून दाखवला आहे. फक्त राजीनामा ठेवून दाखवला नाही तर सरकारला झुकवला आहे राजीनामा घ्यायला भाग पाडला आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा आमचा सगळ्यात मोठा विजय होता.”

पुढे ते म्हणाले की, “सप्टेंबर महिन्यात पक्षाचे सर्वकाही ठरेल.” CJP बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल यांच्या विचारांवर चालणारी पार्टी असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. देशभरातील नागरिकांशी संवाद साधण्याची तयारीही त्यांनी व्यक्त केली.

Published on: Aug 06, 2026 03:40 PM

Follow Us