AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar Health Update : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार; या नेत्यांकडून भेटीगाठी आणि फोन

Sharad Pawar Health Update : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार; या नेत्यांकडून भेटीगाठी आणि फोन

| Updated on: Nov 06, 2026 | 7:22 PM
Share

शरद पवार यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे, राहुल गांधी, प्रियंका गांधी, राजनाथ सिंह, ममता बॅनर्जी यांनी फोनद्वारे चौकशी केली, तर संजय राऊत, एकनाथ शिंदे, गौतम अदानी यांनी भेट दिली.

शरद पवार यांच्यावर सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अनेक बड्या राजकीय नेत्यांनी संपर्क साधला आहे. काही नेत्यांनी त्यांना रुग्णालयात जाऊन भेट दिली, तर काहींनी फोन करून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पवारांना फोन केला. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनीही शरद पवारांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि ममता बॅनर्जी यांनीही फोन करून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते छगन भुजबळ, विश्वजित कदम आणि उद्योगपती गौतम अदानी यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली व त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. एकनाथ शिंदे यांनीही रुग्णालयात पवारांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे शरद पवार यांच्या तब्येतीची विचारणा केली. उद्धव ठाकरे उद्या दुपारी १२ वाजता ब्रीच कँडीत जाऊन शरद पवार यांची भेट घेणार आहेत.

Published on: Nov 06, 2026 07:22 PM

Follow Us