AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हर्षित राणामुळे टीम इंडियाची नाचक्की! असं काय घडलं की बीसीसीआय देखील नाराज

भारतीय संघात गेल्या काही महिन्यांपासून खेळाडूंना दुखापतींने ग्रासल्याचं दिसत आहे. त्यामुळे टीम इंडियाचे फिजिओ आणि खेळाडू बीसीसीआयच्या रडारवर आले आहे. असं असताना हर्षित राणाबाबत एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे.

हर्षित राणामुळे टीम इंडियाची नाचक्की! असं काय घडलं की बीसीसीआय देखील नाराज
हर्षित राणामुळे टीम इंडियाची नाचक्की! असं काय घडलं की बीसीसीआय देखील नाराजImage Credit source: PTI
| Updated on: Aug 06, 2026 | 4:27 PM
Share

टीम इंडिया वनडे वर्ल्डकप 2027 आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेसाठी रणनिती आखत आहे. पण असं असताना खेळाडूंच्या दुखापतीमुळे संघ बांधणी करणं कठीण होत आहे. याबाबत कर्णधार शुबमन गिलनेही परखड मत व्यक्त केलं आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा इंग्लंड दौऱ्यात दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला दुखापत झाल्याने मोठी बातमी झाली. कारण फिटनेस टेस्ट पास करूनच मैदानात परतला होता. कारण टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी गुडघ्याच्या दुखापतीमुळे हर्षित राणा स्पर्धेला मुकला आणि त्यानंतर त्याने बंगळुरूच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये उपचार घेतले. इंग्लंड दौऱ्यातील फिट होऊन परतला, पण तिसऱ्या टी20 सामन्यात दुखापत झाली आणि स्पर्धेतून आऊट झाला. आता हार्षित राणाबाबत एक मोठा खुलासा समोर आला आहे. हर्षित राणा दुखापग्रस्त नव्हताचं असं सांगितलं जात आहे.

हर्षित राणाचं वजन वाढलं होतं

खराब फिटनेसममुळे गोलंदाजी करताना हर्षित राणाला वारंवार क्रँप येत होते. त्यामुळे त्याला बसवण्याशिवाय पर्याय नव्हता. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, हर्षित राणा ओवरवेट होता. वजन जास्त असल्याने अनफिट होता. सेंटर ऑफ एक्सीलेंसने त्याचं वजन 97 किलो असून त्याला फिट घोषित केलं होतं. खरं तर त्याचं वजन 96 किलोच्या वर नसायला हवं. रिपोर्टमधील दाव्यानुसार, संघ व्यवस्थापनाला हर्षित राणा संघात हवा होता, त्यामुळे त्याला घाई गडबडीत क्लीयरन्स दिलं गेलं. त्यामुळे आता नव्या वादाला फोडणी मिळाली आहे. बीसीसीआयने आता सर्व प्रकरण खोदून काढण्यास सुरूवात केली आहे.

..तर कोणाचंच ऐकू नका! बीसीसीआयचा संताप

हर्षित राणा प्रकरणानंतर बीसीसीआयचा संताप झाला आहे. इतकंच काय तर फिजिओ सक्त ताकीदही दिली आहे. कोणाचं ऐकू नका आणि सर्व खेळाडूंच्या फिटनेससाठी एकच मानक ठेवा. त्यामुळे श्रीलंका कसोटी मालिकेनंतर बरंच काही घडणार असं चित्र आहे. हर्षित राणाच नाही तर टीम इंडियातील इतर खेळाडूही दुखापतीने ग्रस्त आहेत. नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, साई सुदर्शन, वॉशिंग्टन सुंदर दुखापत ग्रस्त आहेत.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल