AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज; एकनाथ शिंदेंकडे मांडली कैफियत

महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज; एकनाथ शिंदेंकडे मांडली कैफियत

| Updated on: Nov 07, 2026 | 4:59 PM
Share

महायुतीमध्ये शिवसेनेला जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचा आरोप शिवसेना नेत्यांनी केला आहे. शासकीय कार्यक्रम, तसेच महत्त्वाच्या बैठकांमध्ये सन्मान मिळत नसल्याने नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली. शिंदेंनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असून, यामुळे महायुतीतील अंतर्गत धुसफूस समोर आली आहे.

राज्यातील सत्ताधारी महायुतीमध्ये पुन्हा एकदा अंतर्गत कुरबुर सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. महायुतीतील शिवसेनेच्या (शिंदे गट) नेत्यांनी शासकीय कार्यक्रमांमध्ये आपल्याला जाणीवपूर्वक डावलले जात असल्याची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली आहे. सूत्रांनुसार, गेल्या वर्षभरापासून भाजपकडून शिवसेनेला उपेक्षित ठेवले जात असल्याचा आरोप या नेत्यांनी केला आहे. संविधान बचाव पदयात्रा, नवी मुंबई विमानतळावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात तसेच कुलाब्यातील घरांच्या चावी वाटपाच्या सोहळ्यातही शिवसेनेच्या नेत्यांना योग्य सन्मान मिळाला नाही, अशी त्यांची कैफियत आहे.

वर्षावरील दुष्काळ बैठकीलाही त्यांना बोलावण्यात आले नव्हते. प्रशासकीय अधिकारी भाजप नेत्यांचेच ऐकत असल्याचा दावाही त्यांनी केला. महायुतीमध्ये असूनही डावलले जात असेल तर युतीचा काय फायदा, अशी भावना नेत्यांनी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या तक्रारी ऐकून घेतल्या असून, त्यावर योग्य तोडगा काढू, असे आश्वासन दिले आहे.

Published on: Nov 07, 2026 04:59 PM

Follow Us