AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोकुळ दुध संघाबाबत मोठी अपडेट समोर! सरकारच्या 'त्या' निर्णयाला राज्यपाल जिष्णू देव वर्मांची मंजुरी

गोकुळ दुध संघाबाबत मोठी अपडेट समोर! सरकारच्या ‘त्या’ निर्णयाला राज्यपाल जिष्णू देव वर्मांची मंजुरी

| Updated on: Nov 07, 2026 | 3:42 PM
Share

गोकुळ दूध संघासाठी राज्यपालांनी अध्यादेशाला मंजुरी दिली आहे, ज्यामुळे संचालक मंडळात सरकारच्या पाच स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होणार आहे. यापैकी चार सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळाल्याने, महायुतीचे संख्याबळ वाढून गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष बसण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सतेज पाटलांनी या निर्णयावर तीव्र टीका करत मोर्चाची घोषणा केली आहे.

गोकुळ दूध संघाच्या राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. शासनाच्या निर्णयाला राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी मंजुरी दिली असून, गोकुळसाठी काढण्यात आलेल्या अध्यादेशावर त्यांची मोहोर उमटली आहे. या अध्यादेशानुसार, वार्षिक ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांच्या संचालक मंडळात सरकारला पाच सदस्य नियुक्त करता येणार आहेत. विशेष म्हणजे, या पाचपैकी चार स्वीकृत सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे.

गोकुळच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या पॅनलचे तेरा, तर महायुतीचे बारा संचालक निवडून आले होते. अध्यक्ष निवडीसाठी १४ संचालकांची आवश्यकता असल्याने, आता चार स्वीकृत सदस्यांच्या समावेशामुळे महायुतीचे संख्याबळ १६ पर्यंत पोहोचणार आहे. यामुळे गोकुळ दूध संघावर महायुतीचा अध्यक्ष विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाच्या या निर्णयावर सतेज पाटलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, याविरोधात कोल्हापुरात मोर्चा काढण्याची घोषणा त्यांनी केली आहे.

Published on: Nov 07, 2026 03:41 PM

Follow Us