Mumbai Air Pollution : दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; BKC मध्ये AQI 170 वर, निर्बंध झुगारून आतषबाजी सुरूच
मुंबईत वायू प्रदूषणाच्या वाढत्या पातळीच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांवर निर्बंध घालण्यात आले होते. तरीही दिवाळीत नागरिक मोठ्या प्रमाणात फटाके फोडत आहेत. यामुळे मुंबईची हवा गुणवत्ता खालावली असून, अनेक भागांमध्ये AQI चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. प्रशासनाच्या जनजागृती मोहिमांचा फारसा परिणाम झालेला नाही, असे दिसून येत आहे.
मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वायू प्रदूषणाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर फटाके फोडण्यावर निर्बंध घातले आहेत. मात्र, दिवाळीच्या दिवसांमध्ये या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. गेल्या दोन दिवसांपासून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात फटाके फोडल्याने मुंबईतील प्रदूषण पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.
या संदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, परंतु प्रशासनाच्या जनजागृती मोहिमेचा अपेक्षित परिणाम झालेला नाही. याचा थेट परिणाम मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेवर झाला आहे. काल मुंबईचा सरासरी AQI १०७ होता, तर आज सकाळी तो १०३ नोंदवला गेला आहे. बांदरा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये काल सर्वाधिक १७० AQI नोंदवला गेला, जो आरोग्यासाठी अत्यंत खराब मानला जातो. चकाला अंधेरी (१०६), चेंबूर (१११), कांदिवली वेस्ट (१०३) आणि बांदरा ईस्ट (१३६) यांसारख्या इतर भागांमध्येही AQI वाढलेला दिसतोय.
न्यायालयाच्या निर्देशानुसार फटाके फोडण्यास बंदी असतानाही नागरिकांकडून याचे उल्लंघन होत आहे. आगामी दोन दिवसांतही प्रदूषणात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे, कारण दिवाळीच्या उत्साहात फटाक्यांची आतिषबाजी सुरूच आहे.
Published on: Nov 07, 2026 02:04 PM
दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; BKC मध्ये AQI 170 वर....
युतीतच डावललं जात असेल तर फायदा काय? शिंदे गटाच्या नेत्यांची एकनाथ....
E20 पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण 30 टक्क्यांपार? कर्नाटकच्या अहवालाने
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत तटकरे यांचं ते वक्तव्य; रुपाली ठोंबरे..

