AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather update : देशावर मोठं अस्मानी संकट, यंदा मान्सूनचा पाऊस घाम फोडणार, पहिला अंदाज जाहीर, महाराष्ट्राबाबत मोठी बातमी

गेल्यावेळी वेळेआधी मान्सून दाखल झाला होता. दरम्यान त्यानंतर आता देशासह राज्यात यंदा मान्सूनचं प्रमाण कसं असणार? याबाबतचा पहिला अंदाज आता समोर आला आहे. या नव्या अंदाजामुळे चिंता वाढली आहे.

Weather update : देशावर मोठं अस्मानी संकट, यंदा मान्सूनचा पाऊस घाम फोडणार, पहिला अंदाज जाहीर, महाराष्ट्राबाबत मोठी बातमी
2026 Monsoon ForecastImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 11, 2026 | 3:40 PM
Share

भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेती हा भारतामधील अनेक लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. मात्र भारतामधील शेती ही प्रमुख्यानं पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कधी अतिवृष्टी होते, त्याचा पिकांना फटका बसतो, तर कधी-कधी पाऊसच पडत नाही, त्यामुळे शेतकरी दुष्काळाच्या दुष्टचक्रामध्ये अडकतात. पावसाच्या असमान प्रमाणामुळे सध्या भारतामधील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. गेल्यावर्षी देशासह राज्यात मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाला होता. अनेक राज्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला. यामधून महाराष्ट्र देखील सुटला नाही. अति पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. दरम्यान यंदा देशात पावसाचं प्रमाण कसं असणार? याबाबतचा पहिला अंदाज समोर आला आहे, मात्र यामुळे आता चिंतेत भर पडली आहे. जागतिक हवामान संघटनेकडून यावर्षीचा मान्सूनबाबतचा पहिला अंदाज जाहीर करण्यात आला आहे.

जागतिक हवामान संघटना (WMO) ने वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी भारतामध्ये मान्सूनवर अल नीनोचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. जर हा अंदाज खरा ठरला तर यावर्षी देशात पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. भारतामधील बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे या भाकीतामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढू शकते. महाराष्ट्रातही यावेळी अल नीनोचा प्रभाव पहायला मिळू शकतो, त्यामुळे राज्यातही पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर यावर्षी मात्र उन्हाचा कडाका चांगलाच जाणवणार आहे. यावर्षी तापमानात मोठी वाढ पहायला मिळू शकते असा इशाराही जागतिक हवामान संघटनेकडून देण्यात आला आहे.

मात्र यामध्ये दिलासादायक गोष्ट म्हणजे काही हवामान तज्ज्ञांच्या मते सध्या तरी अल नीनोच्या प्रभाबाबत कोणताही अंदाज वर्तवणं हे घाईचं ठरू शकतं. मात्र देशात पावसाची परिस्थिती काय असणार? अल नीनोचा देशातील पावसाला कितपत फटका बसणार? याच चित्र मे नंतरच स्पष्ट होऊ शकतं. त्यामुळे सध्या चिंता करण्याचं कारण नाही, मात्र या वर्षी पावसावर अल नीनोचं सावट आहे.

Follow Us
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?