AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CJP Protest | जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण? जाणून घ्या संपूर्ण कहाणी

CJP Protest | जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण? जाणून घ्या संपूर्ण कहाणी

| Updated on: Jul 28, 2026 | 11:40 AM
Share

दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान चर्चेत आलेल्या मोहम्मद इरफान या तरुणाची कहाणी आता देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ त्यांनी मांडलेल्या भावना आणि सरकारवर केलेल्या टीकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर देशभरातून त्यांच्या वक्तव्याची चर्चा सुरू झाली.

दिल्लीजवळील बहादुरगड परिसरातील झोपडपट्टीत राहणारे मोहम्मद इरफान हे फेरीवाले असून, आपल्या वडिलांच्या बर्फ विक्रीच्या व्यवसायात मदत करतात. अत्यंत साध्या परिस्थितीत राहणाऱ्या इरफान यांना औपचारिक शिक्षण मिळालेलं नसल्याचं सांगितलं जातं. मात्र, सामाजिक प्रश्नांवरील त्यांची स्पष्ट भूमिका आणि प्रभावी मांडणी यामुळे ते चर्चेत आले आहेत.

आंदोलनानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी इरफान यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली, तर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही त्यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, इरफान यांनी एका मुलाखतीत संविधान, शिक्षण व्यवस्था, देशाचं राजकारण आणि सामाजिक विषमता यांसारख्या विविध विषयांवर आपली मतं व्यक्त केली.

20 जुलै रोजी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईबाबत बोलताना इरफान यांनी आपणही लाठीचार्जमध्ये जखमी झाल्याचा दावा केला. पोलिसांनी लाठीचार्ज करण्याऐवजी इतर मार्गांचा अवलंब करायला हवा होता, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

मुलाखतीदरम्यान इरफान यांनी राहुल गांधींकडून अपेक्षा व्यक्त करत, सामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा त्यांचा प्रयत्न महत्त्वाचा असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर, वैचारिक मतभेद असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची संधी मिळाल्यास आपण त्यांनाही भेटू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलताना इरफान यांनी त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त केला. मुलाखतीच्या शेवटी त्यांनी “जय शिवाजी, जय महाराष्ट्र, जय बिहार” अशा घोषणा देत संवादाचा समारोप केला. त्यांच्या या घोषणेची आणि वक्तव्यांची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून, विविध स्तरांतून त्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत.

Published on: Jul 28, 2026 11:40 AM

Follow Us