अजित पवारांसोबतचा जूना फोटो, खास कॅप्शन; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट चर्चेत
दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला 6 महिने पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे अनेक कार्यकर्ते आणि समर्थक भावूक झाले असून ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

सुप्रिया सुळे यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये अजित पवार यांच्यासोबतचा एक जुना फोटो पोस्ट केला आहे. या छायाचित्रात दोघेही एका कार्यक्रमात एकत्र बसलेले दिसत आहेत. फोटोसोबत त्यांनी, “दादा, तुमच्यासोबतच्या आठवणी मनात कायम जिवंत आहेत. We miss you, Dada.” असा भावनिक संदेश लिहिला आहे.
ही पोस्ट समोर आल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया देत अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. समर्थकांनीही कमेंट करून श्रद्धांजली व्यक्त केली आणि कुटुंबाला धीर दिला.
दरम्यान, या पोस्टमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली असून अनेकांनी जुने फोटो आणि आठवणी शेअर करण्यास सुरुवात केली आहे. सुप्रिया सुळे यांच्या या भावनिक पोस्टने पुन्हा एकदा अजित पवार यांच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
Published on: Jul 28, 2026 11:48 AM
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...