AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Modi Govt : खर्च कमी करण्यासाठी मोदी सरकारचा महत्वाचा निर्णय, सरकारी बाबूंना दिला दणका

Modi Govt : केंद्रातल्या मोदी सरकारने सरकारी खर्च कमी करण्यासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाने नवीन कार्यालयीन ज्ञापन जारी केलं आहे.

Modi Govt : खर्च कमी करण्यासाठी मोदी सरकारचा महत्वाचा निर्णय, सरकारी बाबूंना दिला दणका
Govt Cars
| Updated on: Jul 28, 2026 | 2:19 PM
Share

केंद्र सरकारने सरकारी वाहनांचा दुरुपयोग रोखण्यासाठी आणि सरकारी खर्च कमी करण्यासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. नोकरशाहीसाठी हा निर्णय आहे. यापुढे ‘एक अधिकारी, एक सरकारी गाडी’ची पॉलिसी लागू केली आहे. अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाने नवीन कार्यालयीन ज्ञापन जारी केलं आहे. त्यानुसार एखाद्या अधिकाऱ्याला आधीच सरकारी वाहन मिळालं असेल तर अतिरिक्त जबाबदारी मिळाल्यानंतर त्याला दुसरं सरकारी वाहन मिळणार नाही. वित्त मंत्रालयाच्या आदेशात म्हटलय की, जर एखादा अधिकारी अन्य मंत्रालय, विभाग आणि सार्वजनिक उपक्रम किंवा स्वायत्त उपक्रमाचा अतिरिक्त प्रभार संभाळत असेल तर त्याला दुसरी सरकारी कार मिळणार नाही. म्हणजे एका सरकारी अधिकाऱ्यासाठी एकच अधिकृत सरकारी वाहन असेल.

सरकारने सर्व केंद्रीय मंत्रालय आणि विभागांना नव्या व्यवस्थेचं कठोरतेने पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. तसचं ज्या सरकारी वाहनांचा उपयोग होत नाहीय, त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आणि विनाकारण वापर न करण्याचे आदेश दिलेत. केंद्र सरकारचे अधिकारी सार्वजनिक उपक्रम आणि स्वायत्त यंत्रणा निम सरकारी संघटनांच्या वाहनांचा सुद्धा वापर करता येणार नाही. अधिकारी अधिकृत दौरा किंवा सरकारी कार्याशी संबंधित त्या संस्थेमध्ये गेले असतील तर त्याचवेळी वाहनाचा उपयोग करता येईल.

यामुळे इंधन आणि देखभाल खर्च कमी होईल

सप्टेंबर 2022 चे दिशा-निर्देश अधिक प्रभावी पद्धतीने लागू करण्यासाठी हे आदेश देण्यात आले आहेत असं विभागाकडून सांगण्यात आलं. नवीन कार्यालय ज्ञापन सर्व केंद्रीय मंत्रालय आणि विभागांना पाठवण्यात आले आहेत. जेणेकरुन सरकारच्या प्रशासकीय व्यवस्थेत एक समान व्यवस्था लागू व्हावी. एकाच अधिकाऱ्याला अनेक वाहनं मिळू नयेत तसचं प्रशासकीय कार्यप्रणाली अधिक प्रभावी आणि पारदर्शक बनवणं हा या निर्णयामागे उद्देश आहे. यामुळे इंधन आणि देखभाल खर्च कमी होईल. सार्वजनिक पैशाचा योग्य पद्धतीने वापर होईल. मध्यंतरी स्ट्रेट ऑफ हॉर्मुज मध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा जपून वापर करण्याचं आवाहन केलं होतं. आता सरकारने त्याच दिशेने पाऊल टाकलं आहे. बड्या सरकारी अधिकाऱ्यांना घर, वाहन उपलब्ध करुन दिलं जातं.

Follow Us
MH-CET घोटाळ्यावर आदित्य ठाकरे आक्रमक; 99 पर्सेंटाईलचं गूढ उलगडा करा
Aaditya Thackeray PC | MH-CET घोटाळ्यावर आदित्य ठाकरे आक्रमक; 99 पर्सेंटाईलचं गूढ उलगडा करा, मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं!
सुपरस्टारसारखं स्वागत, मग राजीनामा का घेतला?
Priyanka Gandhi | सुपरस्टारसारखं स्वागत, मग राजीनामा का घेतला? धर्मेंद्र प्रधानांवरून प्रियांका गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
कोणत्याही चौकशीला समोर जाण्याचं सांगून अ‍ॅकेडमीचा संचालक नॉट रिचेबल,
MPSC Paper Case | कोणत्याही चौकशीला समोर जाण्याचं सांगून अ‍ॅकेडमीचा संचालक नॉट रिचेबल, सकाळपासूनच... हे काय घडलं?
MHT-CET घोटाळ्यावर CET सेलचं मोठं स्पष्टीकरण; सोशल मीडियावरील दावे...
MHT-CET घोटाळ्यावर CET सेलचं मोठं स्पष्टीकरण; सोशल मीडियावरील दावे दिशाभूल करणारे, म्हणत केला मोठा खुलासा
एकच खळबळ! भाजप नगरसेवकाच्या मुलांचे मार्क थेट...
MHT-CET Paper Case | एकच खळबळ! भाजप नगरसेवकाच्या मुलांचे मार्क थेट... काँग्रेस नेत्याचा धक्कादायक दावा
13 लाखांत चांगले मार्क मिळवून देतो, नामांकित कॉलेजमध्ये... सीईटी...
CET Exam Scam | 13 लाखांत चांगले मार्क मिळवून देतो, नामांकित कॉलेजमध्ये... सीईटी परीक्षेबाबत पालकांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपने खळबळ
पंतप्रधानांसोबत भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोठं घडलं; डाव फिरला अन्...
पंतप्रधानांसोबत भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोठं घडलं; डाव फिरला अन्...  प्रफुल पेटल आणि शरद पवार भेटीची इनसाइड स्टोरी
बारावीत 35%... MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात...
CET Exam Scam | बारावीत 35%... MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात महाघोटाळ्याच्या आरोपांनी खळबळ!
अजित पवारांसोबतचा जूना फोटो, खास कॅप्शन; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट
अजित पवारांसोबतचा जूना फोटो, खास कॅप्शन; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट चर्चेत
जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण?
CJP Protest | जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण? जाणून घ्या संपूर्ण कहाणी