AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra MLC Election Result 2026 : नागपूर ते मराठवाडा, मतमोजणीत मोठी चुरस; कुठे कोण आघाडीवर? विधान परिषद निवडणुकीचे ताजे चित्र

Maharashtra MLC Election Result 2026 : नागपूर ते मराठवाडा, मतमोजणीत मोठी चुरस; कुठे कोण आघाडीवर? विधान परिषद निवडणुकीचे ताजे चित्र

| Updated on: Oct 28, 2026 | 7:58 AM
Share

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीत महायुती तीन, तर महाविकास आघाडी दोन जागांवर आघाडीवर आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे, नागपूर पदवीधरमध्ये सुधाकर कोहळे, तर पुणे पदवीधर आणि मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीचे (पवार गट) उमेदवार आघाडीवर आहेत. अमरावती शिक्षक मतदारसंघात शिंदे गट शिवसेनेचे किरण सरनाईक आघाडीवर असून, दुसऱ्या पसंतीच्या मतांवर अंतिम निकाल अवलंबून आहे.

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीत सध्या महायुती तीन जागांवर, तर महाविकास आघाडी दोन जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र आहे. नागपूर, पुणे, मराठवाडा आणि अमरावती या प्रमुख मतदारसंघांमध्ये मतमोजणी अजूनही सुरू असून, अनेक ठिकाणी दुसऱ्या पसंतीची मते निर्णायक ठरत आहेत.

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे १९व्या फेरीअखेर १७,६०० मतांनी आघाडीवर आहेत. तर, पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (पवार गट) हर्षदा जाधव देशमुख आघाडीवर आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचे सुधाकर कोहळे हे काँग्रेसचे अभिजित वंजारी यांच्यावर मात करत आघाडी मिळवली आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात शिंदे गट शिवसेनेचे किरण सरनाईक जवळपास ३,५१७ मतांनी आघाडीवर आहेत. मराठवाडा पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे (पवार गट) प्रतापसिंह पाटील १०,९३४ मतांनी पुढे आहेत. अनेक ठिकाणी विजयासाठी आवश्यक असलेला कोटा अजून पूर्ण झाला नसल्यामुळे अंतिम निकालाची प्रतीक्षा आहे.

Published on: Oct 28, 2026 07:58 AM

Follow Us