AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CET Exam Scam | 13 लाखांत चांगले मार्क मिळवून देतो, नामांकित कॉलेजमध्ये... सीईटी परीक्षेबाबत पालकांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपने खळबळ

CET Exam Scam | 13 लाखांत चांगले मार्क मिळवून देतो, नामांकित कॉलेजमध्ये… सीईटी परीक्षेबाबत पालकांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपने खळबळ

| Updated on: Jul 28, 2026 | 12:28 PM
Share

महाराष्ट्रातील एमएच-सीईटी (MHT-CET) 2026 परीक्षेच्या निकालावरून नव्या वादाला तोंड फुटलं असून, परीक्षेत कथित अनियमितता झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. बारावीच्या परीक्षेत 35 ते 40 टक्के गुण मिळालेल्या काही विद्यार्थ्यांना एमएच-सीईटीमध्ये 90 ते 100 पर्सेंटाईल कसे मिळाले, असा सवाल उपस्थित करत काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही त्यांची मागणी आहे.

महाराष्ट्रातील एमएच-सीईटी (MHT-CET) 2026 परीक्षेच्या निकालावरून नव्या वादाला तोंड फुटलं असून, परीक्षेत कथित अनियमितता झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. बारावीच्या परीक्षेत 35 ते 40 टक्के गुण मिळालेल्या काही विद्यार्थ्यांना एमएच-सीईटीमध्ये 90 ते 100 पर्सेंटाईल कसे मिळाले, असा सवाल उपस्थित करत काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही त्यांची मागणी आहे.

दरम्यान, इंजिनिअरिंग सीईटी संदर्भातील एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, त्यामध्ये विशिष्ट परीक्षा केंद्र उपलब्ध करून देत चांगले गुण मिळवून देण्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच मोठी रक्कम घेऊन विद्यार्थ्यांना नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून देण्याचाही दावा या ऑडिओमध्ये करण्यात आला आहे.

व्हायरल ऑडिओमध्ये एका अज्ञात पालक आणि दुसऱ्या व्यक्तीमधील संवाद असल्याचा दावा केला जात आहे. या संभाषणात विद्यार्थ्याला विशिष्ट परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्याची व्यवस्था करून अपेक्षित पर्सेंटाईल मिळवून देण्याची आणि त्यानंतर सीओईपी (COEP) तसेच व्हीजेटीआय (VJTI) यांसारख्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून देण्याचं आश्वासन दिल्याचं ऐकू येत असल्याचा दावा आहे. संबंधित व्यक्तीने प्रवेश झाल्यानंतरच पैसे देण्याची अटही संभाषणात मांडल्याचं सांगितलं जात आहे.

टीप: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या कथित ऑडिओ क्लिपची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. TV9 मराठी या ऑडिओ क्लिपच्या सत्यतेची पुष्टी करत नाही.

दरम्यान, एमएच-सीईटी निकालात अनियमितता झाल्याचा दावा करणारे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सीईटी सेलने याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाणे आणि राज्य सायबर विभागाकडे तक्रार दाखल करून चौकशीची मागणी करण्यात आली आहे. सोशल मीडियावरील काही पोस्ट आणि व्हिडिओंमध्ये बारावीमध्ये कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना सीईटीमध्ये 99 ते 100 पर्सेंटाईल मिळाल्याचा तसेच पैशांच्या मोबदल्यात उच्च गुण मिळवून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी हे सर्व दावे दिशाभूल करणारे असल्याचं सांगत परीक्षा निकाल प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि विश्वासार्ह असल्याचा दावा केला आहे.

या पार्श्वभूमीवर एमएच-सीईटी 2026 निकालाबाबत निर्माण झालेल्या वादाकडे राज्यभरातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षण क्षेत्राचं लक्ष लागलं असून, या प्रकरणातील सत्य चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.

 

Published on: Jul 28, 2026 12:28 PM

Follow Us