AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शांततेचा अर्थ असा नाही की… अवघ्या 4 महिन्यांत मोडणार प्रख्यात गायकाचं दुसरं लग्न ? पोस्ट व्हायरल

रॅपर बादशाह आणि पत्नी ईशा रिखी यांच्या लग्नाला अवघे चार महिने झाले असतानाच घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले आहे. ईशाने इंस्टाग्रामवर केलेल्या एका पोस्टमुळे त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. काय लिहीलं आहे ईशाने ?

शांततेचा अर्थ असा नाही की... अवघ्या 4 महिन्यांत मोडणार प्रख्यात गायकाचं दुसरं लग्न ? पोस्ट व्हायरल
4 महिन्यातंच गायकाचा संसार मोडणार ?
| Updated on: Jul 28, 2026 | 3:19 PM
Share

Badshah And Isha : विख्यात रॅपर आणि गायक बादशाह हा त्याच्या गाण्यांप्रमाणेच, त्याच्या पर्सनल आयुष्यामुळेही बराच चर्चेत असतो. आता त्याचं खासगी आयुष्य. त्याचं लग्न पुन्हा एकदा स्पॉटलाइटमध्ये आलं आहे. त्याने पहिलं लग्न तर गपचूप केलं आणि आता दुसऱ्या लग्नाला अवघे 4 महिने होतात न होता तोच घटस्फोटाच्या अफवा उठू लागल्या आहेत. बादशाहेन काही महिन्यांपूर्वी, मॉडेल आणि अभिनेत्री इशा रिखी हिच्याशी दुसरं लग्न केलं होतं. मात्र अलीकडेच ईशा रिखीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली असून त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. लग्नाचे फोटो आणि बादशाहसोबतचे आनंदी क्षण शेअर केल्यानंतर, आता ईशाने एक पोस्ट लिहीली आहे. “माझ्या शांततेचा अर्थ असा नाही की मी सर्व काही स्वीकारले आहे.” या पोस्टनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या असून या दोघांच्या नात्यात नेमके काय सुरू आहे, गोष्टी खूप बिघडल्या आहेत का, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलं आहे,

या पोस्टच्या 5 दिवस आधीच एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये ती आणि बादशाह एकत्र दिसत होते. त्यात त्यांच्या लग्नाचे काही क्षणही दाखवण्यात आले होते. त्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्येत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली . त्यांच्या नात्यात मतभेद झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर अधिक वेगाने पसरू लागल्या.

ईशा रिखीच्या नव्या पोस्टमध्ये काय ?

ईशाने आपल्या नव्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं :

“काही लढाया अशा असतात ज्यांच्या कोणत्याही दिसणाऱ्या जखमा नसतात. बराच काळ मी भीतीपोटी शांत राहिले. मला वाटत होतं की माझ्या पतीकडे खूप प्रभाव, ताकद आणि साधनसंपत्ती आहे. त्यामुळे मी स्वतःलाच समजावत राहिले की शांत राहणं हाच सर्वात सुरक्षित मार्ग आहे. पण माझी शांतता, ही कधीच माझी संमती नव्हती; ती फक्त स्वतःचे संरक्षण करण्याचा एक मार्ग होता. आज मी भीतीऐवजी धैर्याची निवड करत आहे. कदाचित मी अजून संपूर्ण सत्य सांगण्यासाठी तयार नसेन, पण सर्व काही ठीक असल्याचे नाटक करणे आता मला थांबवायचे आहे.” अशी भलीमोठ्ठी पोस्ट तिने लिहीली आहे.

View this post on Instagram

A post shared by Isha Rikhi (@isharikhi)

चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून पाठिंबा

ईशाच्या या पोस्टनंतर अनेक सेलिब्रिटींसह चाहत्यांनीही तिच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिल्या आहेत. करण औजला यांची पत्नी पलक औजला तसेच अभिनेत्री जॅस्मिन भसीन यांनीही तिच्या पोस्टवर कमेंट करून तिला पाठिंबा दर्शवला आहे. चाहत्यांनीही तिला धीर देणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सांगायचं झालं तर, बादशाहने 2012 साली मध्ये जस्मिन मसीहशी पहिले लग्न केलं होतं. जवळपास आठ वर्षं त्यांचं हे नातं टिकलं पण 2020 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. आता बादशाह आणि इशा यांच्या लग्नाला अवघे चार महिने झाले असताना त्या दोघांच्या वैवाहिक आयुष्याबाबत विविध अफवा सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

Follow Us
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय! 10-20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय! 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटांबाबत नवी अपडेट समोर, आता...
MH-CET घोटाळ्यावर आदित्य ठाकरे आक्रमक; 99 पर्सेंटाईलचं गूढ उलगडा करा
Aaditya Thackeray PC | MH-CET घोटाळ्यावर आदित्य ठाकरे आक्रमक; 99 पर्सेंटाईलचं गूढ उलगडा करा, मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं!
सुपरस्टारसारखं स्वागत, मग राजीनामा का घेतला?
Priyanka Gandhi | सुपरस्टारसारखं स्वागत, मग राजीनामा का घेतला? धर्मेंद्र प्रधानांवरून प्रियांका गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
कोणत्याही चौकशीला समोर जाण्याचं सांगून अ‍ॅकेडमीचा संचालक नॉट रिचेबल,
MPSC Paper Case | कोणत्याही चौकशीला समोर जाण्याचं सांगून अ‍ॅकेडमीचा संचालक नॉट रिचेबल, सकाळपासूनच... हे काय घडलं?
MHT-CET घोटाळ्यावर CET सेलचं मोठं स्पष्टीकरण; सोशल मीडियावरील दावे...
MHT-CET घोटाळ्यावर CET सेलचं मोठं स्पष्टीकरण; सोशल मीडियावरील दावे दिशाभूल करणारे, म्हणत केला मोठा खुलासा
एकच खळबळ! भाजप नगरसेवकाच्या मुलांचे मार्क थेट...
MHT-CET Paper Case | एकच खळबळ! भाजप नगरसेवकाच्या मुलांचे मार्क थेट... काँग्रेस नेत्याचा धक्कादायक दावा
13 लाखांत चांगले मार्क मिळवून देतो, नामांकित कॉलेजमध्ये... सीईटी...
CET Exam Scam | 13 लाखांत चांगले मार्क मिळवून देतो, नामांकित कॉलेजमध्ये... सीईटी परीक्षेबाबत पालकांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपने खळबळ
पंतप्रधानांसोबत भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोठं घडलं; डाव फिरला अन्...
पंतप्रधानांसोबत भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोठं घडलं; डाव फिरला अन्...  प्रफुल पेटल आणि शरद पवार भेटीची इनसाइड स्टोरी
बारावीत 35%... MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात...
CET Exam Scam | बारावीत 35%... MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात महाघोटाळ्याच्या आरोपांनी खळबळ!
अजित पवारांसोबतचा जूना फोटो, खास कॅप्शन; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट
अजित पवारांसोबतचा जूना फोटो, खास कॅप्शन; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट चर्चेत