AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Sooryavanshi: झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत वैभवला झंझावात खेळी करावीच लागणार, असं नाही केलं तर…काय घडणार?

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी-20 मालिका सुरु होणार आहे. आता या मालिकेसाठी भारतीय संघ विशेष मेहनत करतील कारण मागील दोन मालिकेत भारतीय संघाला पराभवाचा झटका मिळाला आहे. या मालिकेत वैभवकडे इतिहास रचण्याची संधी असणार आहे.

Vaibhav Sooryavanshi: झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत वैभवला झंझावात खेळी करावीच लागणार, असं नाही केलं तर...काय घडणार?
| Updated on: Jul 23, 2026 | 9:02 AM
Share

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी-20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना आज रंगणार आहे. आता भारतीय संघ ही मालिका जिंकण्यासाठी अतोनात प्रयत्न करतील. भारतीय संघाने मागील दोन टी-20 मालिका गमावल्या आहेत. आता या मालिकेसाठी भारतीय संघ विशेष प्रयत्न करतील आणि मालिका जिंकण्याच्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवतील. या मालिकेतही विशेष लक्ष हे वैभव सूर्यवंशीकडे असणार आहे. भारतीय क्रिकेट संघात पदार्पण करणाऱ्या वैभव सूर्यवंशीची इंग्लंड दौऱ्यात कामगिरी चांगली झाली नाही. यामुळे तो दबावाखाली आला आहे. आता त्याला झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी- 20 मालिकेत संधी दिली मिळाली तर तो, तिथे मोठी खेळी करून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल. जर वैभव सूर्यवंशीने या सामन्यात मोठी खेळी केली, तर तो विश्वविक्रमही प्रस्थापित करू शकतो.

झिम्बाब्वेविरुद्धच्या टी- 20 मालिकेत संजू सॅमसन भारतीय संघात नाही. त्यामुळे, वैभव सूर्यवंशीला तिन्ही सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. जर सूर्यवंशीने टी-20 मालिकेत 11 उत्तुंग षटकार मारले, तर तो इतिहास रचू शकतो. वैभवने आतापर्यंत 37 टी-20 सामने खेळले असून, त्यात त्याने 139 मोठे षटकार ठोकले आहेत. जर त्याने पुढच्या तीन सामन्यांमध्ये आणखी 11 षटकार मारले, तर तो अवघ्या 40 सामन्यांमध्ये 150 षटकारांचा टप्पा गाठेल. असे करणारा तो पहिला फलंदाज ठरू शकतो. सध्या हा विक्रम युएईचा स्फोटक फलंदाज मोहम्मद वसीमच्या नावावर आहे. त्याने 66 डावांमध्ये 150 षटकार पूर्ण केले होते. वैभवकडे एक नवीन विक्रम प्रस्थापित करण्याची सुवर्णसंधी आहे. या यादीत सध्या वेस्ट इंडिजचा एव्हिन लुईस दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर दिग्गज ख्रिस गेल तिसऱ्या क्रमांकावर आहे.

19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना हरारे येथे खेळला गेला होता, जिथे वैभव सूर्यवंशीने 175 धावांची शानदार खेळी केली होती. त्यामुळे, त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपले पहिले अर्धशतक याच मैदानावर करायला आवडेल. जर वैभव सूर्यवंशीने या मालिकेत चांगली कामगिरी केली, तर आशियाई खेळांसाठीच्या अंतिम 11 खेळाडूंमध्ये त्याचे स्थान असू शकते. जर त्याने या मालिकेत धावा केल्या नाहीत, तर त्याला संघातून वगळले जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. इंग्लंड दौऱ्यावरून परतल्यापासून सूर्यवंशीने आपल्या फलंदाजीवर मोठ्या प्रमाणावर काम केले आहे.

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप