AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा

Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा

| Updated on: Sep 29, 2026 | 3:46 PM
Share

शिवसेनेच्या दोन नेत्यांनी एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार असे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. या नेत्यांनी २०२२ च्या बंडाचा उल्लेख करत शिंदे यांनी भाजपला सत्तेत आणल्याचे सांगितले. देवेंद्र फडणवीस केंद्रात गेल्यास एकनाथ शिंदेच राज्याची धुरा सांभाळण्यास पात्र असल्याचेही त्यांनी नमूद केले.

शिवसेनेच्या दोन नेत्यांनी नुकतेच एकनाथ शिंदेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री पदावर भाष्य करताना या नेत्यांनी २०२२ मधील एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा उल्लेख करत भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले. शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सर्वप्रथम या मुद्द्यावर भाष्य करून चर्चेला तोंड फोडले. त्यानंतर रवींद्र धंगेकर यांनीही त्यांचीच  शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदाची भविष्यवाणी केली. नरेंद्र भोंडेकर यांनीही रघुवंशींच्या वक्तव्याचा दाखला देत भाजपला टोला लगावला.

या नेत्यांनी भारतीय जनता पक्षाला एकनाथ शिंदे यांनीच जीवदान दिल्याचे म्हटले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजप सत्तेत नव्हता आणि एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केल्यावरच भाजप सत्तेत आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शिंदे यांच्या बंडामुळेच २०२२ मध्ये सत्ता स्थापन झाली, हा क्रेडिट विसरता कामा नये अशी अपेक्षा या नेत्यांनी व्यक्त केली. मोठ्या भावाने (भाजप) छोट्या भावाला (शिवसेना) समजून घ्यावे आणि अन्याय करू नये अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

Published on: Sep 29, 2026 03:46 PM

Follow Us