अखेर ती वादग्रस्त डिफेन्डर कार जरांगे पाटील यांनी केली परत, अंतरवाली सराटीत पोहचल्यानंतर घेतला निर्णय
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मंगळवारी छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अंतरवाली सराटीत पोहोचले आणि त्यांना आपल्या मराठा बांधवाशी हितगुज केले आहे.

ज्ञानेश्वर लोंढे, प्रतिनिधी, टीव्ही ९ मराठी : मराठा आंदोलक जरांगे पाटील यांची डिफेन्डर कार आंदोलनादरम्यान चांगलीत चर्चेत आली होती. ही वादग्रस्त ठरलेली डिफेन्डर कार आता मनोज जरांगे यांनी परत केली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अंतरावाली सराटीत आल्यानंतर मूळ मालकाला ही कार परत करण्यात आली आहे. ही डिफेन्डर कार जरांगे वापरत असल्याने त्यांना टीकेला सामोरे जावे लागत होते. मनोज जरांगे यांच्यावर अमोल खुणे, अजय बारस्कर आदींनी या कारवरुन खूप टीका केली होती. त्यानंतर अखेर या कारच्या मूळ मालकाला ही कार घेऊन जाण्यास सांगण्यात आले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या वापरात असलेली डिफेन्डर कार अखेर परत केली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या गॅलक्सी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आज जरांगे पाटील अंतरवाली सराटीत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी डिफेंडर गाडीच्या मालकाला फोन करून ही गाडी परत घेऊन जाण्यास सांगितल्याची माहिती समोर आली आहे.जरांगे पाटील अंतरवाली सराटीत पोहोचल्यानंतर डिफेंडरच्या मालकाला गाडी घेऊन जाण्यास सांगितले आहे. त्यानंतर गाडीचा मालक सुभाष भोसले यांनी डिफेंडर कार परत नेल्याची माहिती आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या वापरातील ही डिफेंडर गाडी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आली होती. ही गाडी आपली नसून एका समाजबांधवाने वापरण्यासाठी दिल्याचे जरांगे पाटील यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. गाडीचे मालक सुभाष भोसले हे सांगोला तालुक्यातील चिकमहूद येथील असल्याची माहिती यापूर्वी समोर आली होती. छत्रपती संभाजीनगरच्या गॅलक्सी रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर अंतरवालीत दाखल झाल्यानंतर डिफेंडर परत करण्याचा निर्णय घेतल्याने या गाडीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
