AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘META भाजपाचा बेटा !, युवक काँग्रेसचे फेसबुक – इन्स्टाग्रामची खाती बंद केल्याच्या निषेधार्त आंदोलन

भाजप आणि संघाविरोधात आवाज उठवणाऱ्यांचे सोशल मीडियावरील अकाऊंट बंद केल्याने या कारवाईचा निषेध करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचे पोस्टर जाळले आहे.

'META भाजपाचा बेटा !, युवक काँग्रेसचे फेसबुक - इन्स्टाग्रामची खाती बंद केल्याच्या निषेधार्त आंदोलन
meta office bkc congress agitation today
| Updated on: Nov 20, 2026 | 9:06 PM
Share

भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात आवाज उठवणाऱ्यांची सोशल मीडियाची खाती बंद केल्याच्या विरोधात युवक काँग्रेसने आज जोरदार आंदोलन केले आहे. सोशल मीडिया खाती निलंबित करुन केंद्र सरकार लोकशाहीवादी आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे. याच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसने बीकेसी येथील वर्ल्ड वनमधील META कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले. मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचे पोस्टर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला.

भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब आणि राष्ट्रीय प्रभारी मनिष शर्मा यांची सोशल मीडिया खाती निलंबित करण्यात आल्याची घटना म्हणजे विरोधी विचारांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारला प्रश्न विचारणाऱ्या आणि विरोधी मते मांडणाऱ्यांचे आवाज बंद करण्याच्या या कारवाईचा तीव्र निषेध करण्यात आला.

लोकशाहीत सरकारला प्रश्न विचारण्याचा आणि आपले मत मांडण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. सोशल मीडिया अकाउंट निलंबित करून हा अधिकार हिरावून घेण्याचे प्रयत्न खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी दिला.

यावेळी ‘meta भाजपाचा बेटा ‘अशा घोषणा देण्यात आल्या

या आंदोलनात मुंबई युवक काँग्रेसचे प्रभारी पवन मजीठिया, प्रदेश महासचिव अमनदीप सैनी, उत्तर मध्य जिल्हाध्यक्ष निखिल रुपारेल, उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष अब्दुल समद, उत्तर पूर्व जिल्हाध्यक्ष शेखर जगताप, विधानसभा अध्यक्ष विकास जयस्वाल, आशिष सरोज, राहुल पेडणेकर, शिवेंद्र घोरपडे यांच्यासह मुंबई युवक काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लोकशाहीवादी आवाज दडपण्याच्या कोणत्याही प्रयत्नाविरोधात युवक काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहील, असेही झीनत शबरीन यांनी स्पष्ट केले.

Follow Us
बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट....
Sanjay Shirsat : बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट यांनी घेतली मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची भेट
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराजी....
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराज असल्याची चर्चा
जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती
Chandrashekhar Bawankule : जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती आयकर विभागापर्यंत पोहोचणार
दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकार
Mumbai Water : दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर शिंदेंची
Eknath Shinde Helicopter : पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग....
Nashik : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग; नेमकं काय घडलं?
सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी...
PM Modi : सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी FICCIच्या व्यासपीठावरून सुनावलं
लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर
Gold Silver Price Today : लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर अचानक घसरले...
पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल....
Nagpur : पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल; नागपुरातील विदारक वास्तव आलं समोर
सैराटमधील आर्ची-परश्याच्या गाजलेल्या विहिरीने गाठला तळ; 50 फुटांची....
Solapur : सैराटमधील आर्ची-परश्याच्या गाजलेल्या विहिरीने गाठला तळ; 50 फुटांची विहीर कोरडीठाक सोलापुरातील दुष्काळाचं भीषण वास्तव समोर